fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत एमडब्ल्युटीए बी, डायमंडस् संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत  एमडब्ल्युटीए बी संघाने मॅर्निंग स्टार्स संघाचा तर  डायमंडस् संघाने सोलारीस गो गेटर्स संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  एमडब्ल्युटीए बी संघाने मॅर्निंग स्टार्स संघाचा 18-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात 80अधिक गटात गजानन कुलकर्णी व मंदार मेहेंदळे या जोडीने नंदन यार्डी व गीता गोडबोले यांचा 6-2 असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. खुला गटात आदित्य जोशी व श्वेतल शहा तसेच आशिष दिके व उमेश भिडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत संघाला विजय मिळवून देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुस-या सामन्यात डायमंडस् संघाने  सोलारीस गो गेटर्स संघाचा 18-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. डॉ.साठे, अमित लाटे, सारंग पाबळकर, योगेश पंतसचिव,  राजू कांगो व सारंग देवी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:    

एमडब्ल्युटीए बी वि.वि मॅर्निंग स्टार्स 18-5(80अधिक गट: गजानन कुलकर्णी/मंदार मेहेंदळे वि.वि नंदन यार्डी/ गीता गोडबोले 6-2, खुला गट: आदित्य जोशी/श्वेतल शहा वि.वि आनंद सुलाखे/ श्रीराम मोने 6-2, आशिष दिके/उमेश भिडे वि.वि संतोष कटारीया/ मोहन भंडारी 6-1)

डायमंडस् वि.वि सोलारीस गो गेटर्स 18-4(80अधिक गट: डॉ.साठे/अमित लाटे वि.वि आशिष कुबेर/वसंत साठे 6-1, खुला गट: सारंग पाबळकर/योगेश पंतसचिव वि.वि अमोल गायकवाड/अश्विन हळदणकर 6-2, राजू कांगो/सारंग देवी वि.वि संतोष शहा/ शिव जावडेकर 6-1)

You might also like