कॅपोविटज प्रायव्हेट लिमिटेड, मानेग्रो आणि टॉवर ट्रान्समिशन यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी, एमडब्लूटीए, टीएफएल, गोल्डन बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस कोर्ट, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत विकास चौधरी, श्रीराम ओका वि.वि. गिरीश कुकरेजा, सचिन माधव 6-4; 90 अधिक गट: केदार राजपाठक, सुरेंद्र कांडत यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टीएफएल संघाने मॉन्ट व्हर्ट संघाचा 15-10 असा पराभव केला. पीवायसी संघाने टेनिस नट्स पंचायत 2 संघाचा 17-14 असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून योगेश पंतसचिव, सारंग पाबळकर, अमित लाटे, ध्रुव मेड यांनी सुरेख कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
एमडब्लूटीए वि.वि.मुधोजी क्लब 1 18-03(60 अधिक गट: विवेक खडगे/भूषण जोशी वि.वि. सौरभ खरे/महेश बर्वे 6-1; 80 अधिक गट: जयदीप वाकणकर/सुमंत पॉल वि.वि.नरेंद्र पवार/वरुण जाधव 6-2; 90 अधिक गट: संजय आशेर/पार्थ मोहपात्रा वि.वि.सुनील बर्वे/अभिजित मोहिते 6-0);
टीएफएल वि.वि.मॉन्ट व्हर्ट 15-10(60 अधिक गट: अजिंक्य पाटणकर/जितेंद्र सावंत पराभूत वि.शिलादित्य बॅनर्जी/मनीष टिपणीस 3-6; 80 अधिक गट: विकास चौधरी/श्रीराम ओका वि.वि. गिरीश कुकरेजा/सचिन माधव 6-4; 90 अधिक गट: केदार राजपाठक/सुरेंद्र कांडत वि.वि.सुधाकर आर/एसपी झंझोटे 6-0);
गोल्डन बॉईज वि.वि.एमएसएलटीए बालेवाडी 18-03(60 अधिक गट: मुकुंद जोशी/आशिष पुंगलिया वि.वि.सिद्धार्थ गुप्ता/गौतम सोपल 6-3; 80अधिक गट: आदित्य उपाध्याय/केदार पाठक वि.वि.सुजित बालन/प्रवीण 6-3);
पीवायसी वि.वि.टेनिस नट्स पंचायत 2 17-14(60अधिक गट: मिहीर दिवेकर/रोहन जमेनिस पराभूत वि.आलोक नायर/दीपक पाटील 5-6(2-7);80 अधिक गट: योगेश पंतसचिव/सारंग पाबळकर वि.वि.सलील कुंचूर/चन्ना कुमार 6-3;90 अधिक गट: अमित लाटे/ध्रुव मेड वि.वि.अमित किंडो/सुधुर पिसाळ 6-5(7-2));
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नरची एन्ट्री, टेबल टॉपर फक्त ‘किंग कोहली’