नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात ‘ब’ गटातील महत्वपूर्ण शेवटची लढत झाली. नांदेड संघ सामना जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्यासाठी खेळणार होती. तर रत्नागिरी अरावली ॲरोज संघाला टॉप 4 मध्ये येण्यासाठीकिमान 7 गुणांनी विजय आवश्यक आहे. तसा न झाल्यास आकाश शिंदेचा नाशिक संघ टॉप 4 मध्ये आपली जागा निश्चित करणार होता.
नांदेड संघाने आक्रमक सुरुवात करत रत्नागिरी संघावर मध्यंतरापर्यत 3 वेळा ऑल आऊट करत 35 -11 अशी आघाडी मिळवली. नांदेड कडून ऋषिकेश भोजनेने अष्टपैलू खेळ केला. तर चढाईत अक्षय सूर्यवंशीने सुपरटेन पूर्ण केला.
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने 56-23 असा विजय मिळवला. नांदेडच्या विजयाने नाशिक संघ प्रमोशन व प्ले-ऑफ साठी पात्र झाला. नांदेड कडून ऋषिकेश भोजने ने चढाईत 16 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. तर अजय सूर्यवंशी ने 12 गुण मिळवत चांगला खेळ दाखवला. तर अभिषेक बोरुडे ने 6 पकडी केल्या. रत्नागिरी कडून साईराज कुंभार आणि वेद पाटील ने 7-7 गुण मिळवले. (Nanded Chambal Challengers team undefeated in the group)
बेस्ट रेडर- ऋषीकेश भोजने, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- ऋषीकेश भोजने, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाशिक द्वारका डिफेंडर्सचा सलग तिसरा विजय
अटीतटीच्या लढतीत परभणी संघाचा विजय तरीही टॉप 4 मधून बाहेर