आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिला हेप्टाथलॉन खेळात एक नवा वाद समोर आला आहे. या खेळात एका तृतीयपंथी खेळाडूने पदक जिंकल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची माहिती इतर कुणी नाही, तर भारताच्याच महिला खेळाडूने दिली आहे. तसेच, जिच्याविषयी हे सांगितले जात आहे, तीसुद्धा एक भारतीय ऍथलिट आहे.
झाले असे की, रविवारी (दि. 1 ऑक्टोबर) स्पर्धेत झालेल्या महिला हेप्टाथलॉन (Heptathlon) खेळात भारतीय ऍथलिट स्वप्ना बर्मन चौथ्या क्रमांकावर राहिली. म्हणजेच, ती एक स्थान मागे राहिल्यामुळे पदकाला मुकली. हे पदक तिची सहकारी भारतीय ऍथलिट नंदिनी अगसरा (Nandini Agasara) हिच्यामुळे हुकले. नंदिनी हेप्टाथलॉन खेळात तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यामुळे तिला कांस्य पदक मिळाले.
नंदिनी अगसराने पदक जिंकल्यानंतर स्वप्ना बर्मन हिने ट्विटर या तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट केले. तिने ट्वीटमध्ये नंदिनीला स्पष्टपणे तृतीयपंथी (Transgender) म्हटले. तिने हेदेखील म्हटले की, तिला तिचे पदक परत हवे आहे.
स्वप्नाचे ट्वीट
स्वप्ना हिने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मला माझे कांस्य पदक एका तृतीयपंथी महिलेच्या हातून गमवावे लागले. मला माझे पदक परत हवे आहे. कारण, हे ऍथलिटिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. कृपया माझी मदत करा आणि माझी साथ द्या.”
I have lost my Asian Games bronze medal to a transgender women at the 19th Asian Games held in Hangzhou,China.
I want my medal back as it is against the rules of our Athletics. Help me and support me please. #protestforfairplay
— Swapna Barman (@Swapna_Barman96) October 2, 2023
स्पर्धेत स्वप्नाची कामगिरी
शेवटी स्वप्ना बर्मन महिलांच्या हेप्टाथलॉन स्पर्धेत 5708 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. ती कांस्य पदकापासून फक्त चार गुणांनी वंचित राहिली. तिसरे स्थान तिची देशबांधव नंदिनी अगसराने मिळविले. तिने एकूण 5712 गुण मिळवले. (nandini is a transgender said swapna barman transgender controversy in heptathlon asian games 2023 read more)
हेही वाचा-
Asian Games 2023 । तजिंदरपालने सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्ण, अविनाश साबळेनेही रचला इतिहास
VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान