पुणे (12 मार्च 2024) – ‘ब’ गटातील दुसरा सामना नंदुरबार जिल्हा विरुद्ध सांगली जिल्हा या संघाच्या मध्ये झाला. दोन्ही संघाना पहिल्या चढाईत गुण मिळाले नाहीत. सांगलीच्या दुसऱ्या चढाईत अभिराज पाव ने गुण मिळवत आपल्या संघाचा खात उघडला. तर नंदुरबारच्या तेजस राऊत ने पुढील चढाईत गुण मिळवत आपाल्या संघाचा खात उघडला. दहा मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघ 7-7 अश्या बरोबरीत होते. दोन्ही संघांनी चढाईत 5 तर पकडीत 2 गुण मिळवला होते.
अत्यंत चुरशीच्या या सामन्यात दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळले. मध्यंतरा पर्यत कोणत्याही संघाला 2 पेक्षा मोठी आघाडी एकदाही मिळवता आली नाही. मध्यंतराला सांगली संघाकडे 12-10 अशी नाममात्र 2 गुणांची आघाडी होती. मध्यंतरा नंतर थोडा झटापट खेळ झाला. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना सांगली संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 23-19 अशी 2 गुणांपेक्षा मोठी आघाडी मिळवली.
सामन्याची शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना तेजस राऊत ने सुपर रेड करत 28-27 अशी नंदुरबार संघाला आघाडी मिळवून दिली होती. तर 1 मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा सांगली कडे 1 गुणांची आघाडी होती. 30 सेकंद शिल्लक असताना नंदुरबार संघाने सांगली ला ऑल आऊट करत सामना आपल्या बाजूने केला. नंदुरबार संघाने चुरशीचा सामना 36-31 असा विजय मिळवला. तेजस राऊत ने सुपर टेन करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. (Nandurbar team beat Sangli team in a tight match)
बेस्ट रेडर- तेजस राऊत, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- ओमकार राठोड, सांगली
कबड्डी का कमाल- श्रेयस उमरदंड, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये कोल्हापूर संघाची विजयी सलामी.
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?