जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमचा दर्जा आता भारतातील नरेंद्र मोदी स्टेडीयमला मिळाला आहे. हे स्टेडीयम गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मोटेरा येथे आहे. या स्टेडीयमची दर्शक क्षमता 1लाख 10हजार पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे 2023मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना या स्टेडीयमवर होऊ शकतो, असे काही अहवालांनुसार समोर आले.
पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद बीसीसीआयजवळ असणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडीयम सध्या बीसीसीआय आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या नियंत्रणाखाली आहे. त्यातच जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमचा फायदा भारताबरोबरच आयसीसीला देखील घ्यायचा आहे. त्यामुळे 2023च्या विश्वचषकाचा अंतिम सामना या मोठ्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) या स्टेडीयमने बनवलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले. आयपीेएल 2022चा अंतिम सामना याच स्टेडीयममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या वेळी स्टेडीयममध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते.
नरेंद्र मोदी स्टेडीयमच्या आधी या स्टेडीयमला मोटेरा स्टेडीयम नावाने ओळखले जायचे. जुने मोटेरा स्टेडीयम 1983मध्ये बांधण्यात आले होते. त्यानंतर 2006मध्ये त्याचे नुतणीकरण करण्यात आलेे. तेव्हापासून नियमीत आंतरराष्ट्रीय सामने या स्टेडीयमवर खेळवले जात होते. त्यानंतर 2015मध्ये हे पूर्ण स्टेडीयम पाडण्यात आले आणि 800 कोटी रुपये खर्च करुन नवीन बनवण्यात आले. या स्टेेडीयमची प्रेक्षक मर्यादा 1 लाख 32000 इतकी आहेे. त्यामुळे आता मोठे सामने या मैदानावर नक्की बघायला मिळतील. क्रिकेट व्यतिरिक्त या मैदानावर सांस्कृतीक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले.
24 फेब्रुवारी, 2021ला या स्टेडीयमचे नामकरण गुजरात क्रिकेट असोसिएशनने नरेंद्र मोदी स्टेडीयम असे केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे 2009 ते 2014 या काळात अध्यक्ष देखील होते. या मैदानावर पहिला पिंक बॉल कसोटी सामना भारत आणि इंग्लंड या संघादरम्यान खेळला गेला होता. (Narendra Modi Stadium received Guiness Book Of World Record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफी: दमदार कामगिरीसह महाराष्ट्र उपांत्य फेरीत; अशा रंगणार सेमी-फायनलच्या लढती
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, जस क्रिकेट अकादमी संघांचा मोठा विजय