भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने झुंजार 97 धावांची खेळी केली .सामन्यात पूर्णतः ऑस्ट्रेलियाची पकड असून देखील पंतने आक्रमक खेळी करत सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. पंतने विशेषतः भारतीय संघाला सर्वात मोठा धोका समजल्या जाणाऱ्या नेथन लायन विरुद्ध आक्रमक फटके मारले. मात्र अखेर लायननेच पंतला 97 धावांवर बाद केले.
पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पंतने आक्रमक सुरुवात केली. डावातील 79 व्या षटकात लायन गोलंदाजीसाठी आला तेव्हा पंत 97 धावांवर खेळत होता. पंत लवकरच आपले शतक पूर्ण करणार अशी सर्व क्रिकेटरसिकांना आशा होती ,मात्र लायनच्या एका दूर असलेल्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला. पंतच्या या खेळीचे मैदानावर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
When the Lyon vs Pant battle took a U-turn 😯#AUSvIND pic.twitter.com/dwtvZWsAJF
— Wisden (@WisdenCricket) January 11, 2021
पंतने आपल्या 97 धावांच्या खेळीतमध्ये तब्बल 12 चौकार व 3 षटकार ठोकले होते. पंतच्या या आक्रमक खेळीने भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे. या सामन्यात एकवेळ भारतीय संघ पराभव पत्करेल अशी चिन्हे होती. मात्र भारतीय फलंदाजांनी १३१ षटके खेळून काढत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्या खेळीने पंतच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक
शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ