औरंगाबाद| कबड्डी खेळ दिवसेंदिवस वाढत आहे. या खेळातील कौशल्य आत्मसात करून करियर घडण्यासाठी अनेक खेळाडु प्रयत्नशील आहेत. अश्या खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञान याची आवश्यकता आहे. दर वर्षी किशोर-किशोरी, कुमार-कुमारी, पुरुष-महिला गट आणि शालेय व आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
वर्षभरात होणाऱ्या यासर्व कबड्डी स्पर्धांच्या पूर्वतयारी साठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शा. शी. महाविद्यालय खडकेश्वर औरंगाबाद च्या मैदानावर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक व महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाला ११ वर्षानंतर ६५ व्या राष्ट्रीय स्पर्धात सुवर्णपदक डॉ. माणिक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी प्रशिक्षण शिबिर सुरू होत आहे.
ज्या खेळाडूंना कबड्डीत भविष्य घडवायचे आहे, कबड्डी करियर करण्याची इच्छा आहे अश्या जास्तीत जास्त खेळाडू या शिबिरात सहभागी व्हावे असे औरंगाबाद जिल्ह्या कबड्डी असो. चे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथरीकर, कार्याध्यक्ष श्री. बाबुराव अतकरे, डॉ. विजय पाथरीकर, सचिव एन.आर. घूले यांनी सागितलं आहे.
उद्या दिनांक १५ जून २०१९ पासून हे प्रशिक्षण शिबीर सुरू होत असून रोज संध्याकाळी ४:३० ते ७:०० या वेळेत होईल. बाहेरगावच्या खेळाडूंसाठी मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक संपर्क साठी डॉ. माणिक राठोड राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क: डॉ. माणिक राठोड- 8149323287