पुणे – लष्करी क्रीडा संस्था आणि सेनादल क्रीडा संस्था या लष्कराच्याच दोन संघांत राष्ट्रीय रोईंग स्पर्धेची अंतिम लढत खेळविली जाईल. पुरुषांच्या विभागात नौकानयन प्रकारातील या दोन ताकदवान संघांनी विविध ११ शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. चंडिगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश या अन्य चार संघांनी अंतिम फेरी गाठली.
महिला विभागात मात्र विविध सात राज्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन स्पर्धा प्रकारातून अंतिम फेरी गाठली. नाशिकच्या मृण्मयी साळगांवकरने सिंगल स्कल्स प्रकारात ८ मिनिट २२.४ सेकंद वेळ देत अंतिम फेरी गाठत महाराष्ट्राचे आव्हान राखले. मृण्मयीने पंजाबच्या कुशप्रीत कौरला मागे टाकले. पंजाबच्या सतनाम लिंगने ७ मिनिट १७. ३ सेकंद वेळ देत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील अरविंद सिंगला पराभूत केले. अंतिम फेरीत त्याची गाठ लष्कराच्या करमजीतशी पडेल.
लष्कराच्या खेळाडूंनी कॉक्स एट, सिगल स्कल्स, डबल स्कल्स, क्वाड्रपल स्कल्स, लाईट वेट डबल स्कल्स आणि क़ॉक्सलेस पेअर या प्रकारात अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे सेनादलाच्या संघाने कॉक्सलेस पेअर्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस फोर्स, लाईट वेट डबल स्कल्स या चार प्रकारात अंतिम फेरी गाठली.
निकाल –
पुरुष:
कॉक्स एट : १ लष्कर (अक्षत, जसमेल सिंग, विपुल घुरडे; विकास कुमार; आशिष गोलियान; इक्बाल सिंग; नीरज; योगेश कुमार; धनंजय पांडे); २ मध्य प्रदेश
कॉक्सलेस फोर्स – १ चंडिगड (सुखदीप सिंग; गुलशन कुमार; साहिल मुदगील; आदित्य सिंग; २ हरियाणा
खुली डबल स्कल्स -१ -मध्य प्रदेश (नितेश भारद्वाज; प्रभाकर राजावत; 6:44.9); २ उत्तराखंड
सिंगल स्कल्स -१ -सतनाम सिंग (वैयक्तिक; ७ मिनिट १७.३ सेकंद); २- अरविंद सिंग (७:१८.९से)
कॉक्सलेस फोर्स : १ मध्य प्रदेश (गोपाल ठाकूर; रोहित सेंधव; सोयल; योगेश ठाकूर; (६ मिनिट ३४.९ सेकंद); २ ओरिसा
ओपन डबल स्कल्स : १ ओरिसा (करणबीर सिंग भिंदर; शोभित पांडे ६:५९ ३ सेकंद) २ चंडिगड
सिंगल स्कल्स -१ लष्कर (करमजीत; ७ मिनिट३१.९ सेकंद)); २ -राजस्थान
दुहेरी स्कल्स – १ सैन्य (सुखमीत सिंग, जाकर खान; 6६ मिनिट ५० सेकंद)); २ हरियाणा
क्वाड्रपल स्कल्स – लष्कर (अक्षत, विकास कुमार, नीरज, इक्बाल सिंग); २ दिल्ली
लाइट वेट डबल स्कल्स – १ लष्कर (आशिष फुगट, अरविंदर सिंग; ६ मिनिट ४६.२ सेकंद); २-पंजाब (जसप्रीत सिंग, सुखजिंदर सिंग)
कॉक्सलेस पेअर्स – १ सेनादल (अंकित कासन्या, लेखी राम); २ पंजाब
डबल स्कल्स – १- एसएससीबी (शगनदीप सिंग, परमिंदर सिंग); २ दिल्ली
कॉक्सलेस फोर्स -१ – सेनादल (जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आशिष; ६ मिनिट १२.७ सेकंद) २ झारखंड
लाइट वेट डबल स्कल्स -१ सेनादल (अर्जुन लाल जाट, अजय त्यागी; ६ मिनिट ४३.१ सेकंद)); २ हरियाणा
कॉक्सलेस पेअर्स -१ लष्कर (सन्नी कुमार; कुलबीर); २ तेलंगणा; ३ महाराष्ट्र (तेजस शिंदे, ओंकार म्हस्के; ७मिनिट २.१ सेकंद)
महिला:
दुहेरी स्कल्स – १ मणिपूर (थंगियम प्रिया देवी; हाबिजम तेंडेंथोई देवी; ७ मिनिट ५०.८ सेकंद); २ मध्य प्रदेश
कॉक्सलेस पेअर्स – १- केरळ (आर्चा ए, वर्षा के.बी ; ८ मिनिट १६.६ सेकंद); २ तामिळनाडू
लाइट वेट डबल स्कल्स – १ ओरिसा (अंशिका भारती; रेश्मा कुमारी मिन्झ; ८ मिनिट १३.९ सेकंद), २ अंदमान
कॉक्सलेस पेअर्स – १ ओरिसा (सोनाली स्वेन, रितू कौडी; ८ मिनट १४.५ सेकंद) ; २ मध्य प्रदेश
हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल्स – १ मध्य प्रदेश (विंध्य संकट, पूनम; ७ मिनिट ५९.३ सेकंद); २ हरियाणा
सिंगल स्कल्स – १ पंजाब (कुशप्रीत कौर; ८ मिनिच ३५.९ सेकंद) २ तेलंगणा (बी-हेमलता)
क्वाड्रपल स्कल्स – १ केरळ (अमला प्रसाद; अस्वानी कुमारन, देवप्रिया, अनुपमा टीके; ७ मिनिट २३.१ सेकंद); २ ओरिसा
सिंगल स्कल्स – १ महाराष्ट्र (मृण्मयी साळगावकर; ८ मिनिट २२.४ सेकंद); २ उत्तर प्रदेश (किरण देवी; ८ मिनिट ३२.४ सेकंद)
क्वाड्रपल स्कल्स – १ मध्य प्रदेश (विंध्य संकांत; गुरबानी कौर; मोनिका भदोरिया; पूनम; ७ मिनिट १९.१ सेकंद); २- मणिपूर
(National Sailing. The final battle between the two teams of the army itself)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान
आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला ‘रिमार्क’! भारतीय संघाला…