भारतीय अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आज.भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही संघांमध्ये दुसरा अनधिकृत कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय अ संघातील गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत दक्षिण आफ्रिका अ संघाला ५ बाद १९८ धावा करण्यात यश आले होते. दरम्यान भारतीय अ संघाकडून गोलंदाजी करताना नवदिप सैनीने एक अप्रतिम चेंडू टाकला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत अ संघाकडून गोलंदाजी करताना नवदिप सैनीने पहिल्या डावात ३ गडी बाद केले. त्याने ब्यूरन हेंड्रिक्सला ज्याप्रकारे बाद केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
दक्षिण आफ्रिका अ संघाची फलंदाजी सुरू असताना ९३ वे षटक टाकण्यासाठी नवदिप सैनी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू नवदिप सैनीने टाकला, जो टप्पा पडताच आत आला आणि स्टंप उधळून गेला. ब्युरन हेंड्रिक्सला टाकलेला चेंडू इतका वेगवान होता की, स्टंपला लागताच स्टंप ४ ते ५ फूट लांब जाऊन पडला.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका अ संघाने केल्या २९७ धावा
या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका अ संघाला सर्वबाद २९७ धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये मार्को जेंसंनने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर जॉर्ज लिंडेने ४४ धावांचे योगदान दिले होते. तसेच भारतीय अ संघाकडून गोलंदाजी करताना नवदीप सैनी आणि ईशान पोरेलने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले होते.
Truly one of the most beautiful sights in cricket as Navdeep Saini uproots Beuran Hendricks' off stump.
Marco Jansen however has been the 1st SA A batsmen to score 50 and is desperately hoping for the number 11 to just stay with him.
SA A: 249/9#SAAvINDA pic.twitter.com/xPj1OlFJUq
— ExcelBaby (@Shaun_Analytics) December 1, 2021
भारतीय संघाने पहिल्या डावात केल्या २७६ धावा
या धावांचा पाठलाग करताना सरफराज खानने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर हनुमा विहारीने ५४ आणि पृथ्वी शॉ ने ४२ धावांचे योगदान दिले. भारतीय अ संघाचा संपूर्ण डाव २७६ धावांवर संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिका अ संघाकडून गोलंदाजी करताना ग्लेंटन स्टरमनने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
“ओ पाजी मै गिर गया”, मुंबई कसोटीसाठी ‘प्लेइंग ११’ निवडण्यावरून वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मीम
हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी