Loading...

कसोटी संघाचा भाग नसतानाही नवदीप सैनी या कारणामुळे असणार टीम इंडियाबरोबर

गुरुवारपासून(22 ऑगस्ट) भारतीय संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला नेट बॉलर म्हणून संघाबरोबर ठेवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

सैनीने 3 ऑगस्टला वेस्ट इंडीज विरुद्ध फ्लोरिडा येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

तसेच 2019 विश्वचषकादरम्यान तो भारतीय संघाला नेटमध्ये सराव देणाऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. आता त्याला कसोटी क्रिकेटसाठीही तयार करत असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

ते म्हणाले, ‘हा, नवदीप सैनीला संघ व्यवस्थापनाने कसोटी मालिकेसाठी संघाबरोबर राहण्यास सांगितले आहे. तो संघाबरोबर नेट बॉलर म्हणून असेल. भविष्याच्या दृष्टीने त्याला कसोटी क्रिकेटसाठी तयार करायचे आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘सैनीने मागील काही वर्षात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे गती आहे आणि तो चेंडूची हवेत दिशा बदलू शकतो आणि पिच करु शकतो. जर त्याला चांगले तयार केले तर अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजांची संख्या वाढेल. संघ व्यवस्थापनाचा त्याच्यासाठी हाच विचार आहे.’

Loading...

सैनीने 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीज अ विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात 6 षटके गोलंदाजी देखील केली आहे. ज्यामुळे भारताच्या इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवला विश्रांती मिळेल. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने पहिल्या डावात गोलंदाजी केली नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही

तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या समावेशाबद्दल ही आहे मोठी बातमी

टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी झालेल्या मुलाखतीत तो प्रश्न विचारलाच

You might also like
Loading...