परदीप नरवालचा आणखी एक विक्रम मोडीत, नवीन कुमारने घडवला इतिहास!

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल(11 ऑक्टोबर) ग्रेटर नोएडा येथे दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा लढत झाली. सुरुवातीला दबंग दिल्लीकडे एकतर्फी झुकलेला हा सामना यु मुंबाने ३७-३७ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. पण या सामन्यात दिल्लीच्या नवीन कुमारने सीजन ७ मध्ये २० वा सुपर टेन पूर्ण केला आणि इतिहास घडवला आहे.

प्रो कबड्डीच्या एकाच सीजनमध्ये २० सुपर टेन पूर्ण करणारा नवीन कुमार पहिलाच खेळाडु ठरला. याआधी सीजन ५ मध्ये परदीप नरवालच्या नावावर १९ सुपर टेन होते.

त्यामुळे काल सीजन ७ मध्ये २० वा सुपर टेन पूर्ण करत नवीन कुमारने परदीपचा एका सीजनमध्ये सर्वाधिक सुपर टेन करण्याच्या मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

कालच्या सामन्यांत नवीन कुमारने १२ गुण मिळवले. सीजन ७ मध्ये नवीन कुमारने २१ सामन्यांत २६८ रेड गुण मिळवले आहेत. त्याने २१ पैकी २० सामन्यांत सुपर टेन पूर्ण केले आहेत.

प्रो कबड्डीच्या एका सीजन मध्ये सर्वाधिक सुपर टेन:

नवीन कुमार- २० (सीजन ७)

परदीप नरवाल- १९ (सीजन ५)

पवन शेरावत- १६ ( सीजन ७)

You might also like