क्रिकेटटॉप बातम्या

Champions Trophy; भारतीय संघाच्या घोषणेसाठी एवढा वेळ का? माजी क्रिकेटपटूने साधला निशाना

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) क्रिकेटप्रेमींना नक्कीच उत्सुकता लागली असेल. चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी काही आठवडे बाकी आहेत. पण असे असताना देखील भारताने अद्याप आपला संघ घोषित केला नाही. त्यामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. या स्पर्धेचे यजमापद पाकिस्तानकडे आहे. पण भारताचे सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) रोजी होणार आहे.

शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघ आमने-सामने असणार आहेत. तर भारताचा पहिला सामना (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशविरूद्ध होईल.

भारतीय संघाच्या घोषणेसाठी वेळ लागल्यामुळे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. सिद्धू यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आयसीसीच्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा लांबणीवर पडली आहे. 12 जानेवारीची अंतिम तारीख निघून गेली आहे आणि निवडकर्त्यांची आणि खेळाडूंची चिंता वाढली आहे. 1.5 अब्ज लोक या घोषणेची वाट पाहत आहेत.”

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) च्या शेवटच्या सिडनी कसोटी सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी बुमराहच्या दुखापतीमुळे संघ निवडकर्ते चिंतेत पडले आहेत. यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनी बुमराहबद्दल लिहिले की, सर्वांच्या नजरा बुमराहवर आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी बुमराहच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, “त्याच्या दुखापतीचे गूढ अजूनही उलगडलेले नाही आणि हा केवळ संघाच्या घोषणेत विलंब होण्याचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशाच्या अपेक्षांचा आहे. ही फक्त एका क्रिकेट संघाची बाब नाही, तर देशाच्या आशा एका दिग्गज खेळाडूच्या खांद्यावर आहेत. क्रिकेट जगत बुमराहच्या तंदुरुस्तीची आणि त्याच्या विजयी पुनरागमनाची वाट पाहत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट
दिग्गज विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास, जाणून घ्या यादिवशीचे ‘विराट’ रेकाॅर्ड्स
बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलने सर्वांसमोर बोलणे खाल्ले, ऑस्ट्रेलियात भयंकर चिडला होता गौतम गंभीर!

Related Articles