पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत नवसह्याद्री डायनामाईट्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात गजाजन कुलकर्णी, किशोर स्वामी, रोहन राजापूरकर, आदित्य जोशी, उमेश भिडे, रमेश पाटणकर, आशिष डिके यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर नवसह्याद्री डायनामाईट्स संघाने लॉ चार्जर्सचा 24-1 असा एकतर्फी पराभव केला.
महाराष्ट्र मंडळ संघाने सोलारिस ब संघाचा 21-14असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून अभिषेक चव्हाण, विक्रम श्रीश्रीमळ, कमलेश शहा, विकास बचलू, संजय सेठी, अर्पित श्रॉफ यांनी अफलातून कामगिरी केली. एफसी लिजेंड्स संघाने हिल साईड जिमखाना संघावर 24-10असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
नवसह्याद्री डायनामाईट्स वि.वि.लॉ चार्जर्स 24-1(100अधिक गट: गजाजन कुलकर्णी/किशोर स्वामी वि.वि.नितीन खैरे/मिलिंद राऊत 6-0; खुला गट: रोहन राजापूरकर/आदित्य जोशी वि.वि.श्रीनिवास रामदुर्ग/नितीन खैरे 6-0; 90अधिक गट: उमेश भिडे/रमेश पाटणकर वि.वि.नितीन गवळी/संदीप माहेश्वरी 6-1; खुला गट: गजाजन कुलकर्णी/आशिष डिके वि.वि.विक्रांत गुणे/केदार राजपाठक 6-0);
महाराष्ट्र मंडळ वि.वि.सोलारिस ब 21-14(100अधिक गट: संजय सेठी/धनंजय पूर्वत पराभूत वि.वसंत साठे/अमोल गायकवाड 3-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ वि.वि.शिव जावडेकर/अश्विन हळदणकर 6-4; 90अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू वि.वि.आशय गोखले/प्रसाद श्रीमनी 6-2; खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.आशिष कुबेर/अमोल गायकवाड 6-2);
एफसी लिजेंड्स वि.वि.हिल साईड जिमखाना 24-10(100अधिक गट: पांडुरंग पाडळे/दिपक आगाशे वि.वि.प्रकाश सेठिया/शिशिर जोशी 6-3; खुला गट: कौशिक देशपांडे/आदित्य सोनटके वि.वि.निखिल कोठारी/मधू मुंदडा 6-1; 90अधिक गट: संजय पाटील/श्रीवर्धन सुखात्मे वि.वि.जितू मेहता/मयूर संचेती 6-3; खुला गट: योगेश नातू/अविनाश हूड वि.वि.प्रविण चोरडिया/प्रकाश सेठिया 6-3).