---Advertisement---

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये फायनल! विजेतेपदासाठी नीरज आणि अरशदमध्ये टक्कर

Neeraj Chopra and Arshad Nadeem
---Advertisement---

आगामी आशिया चषक 30 ऑगस्ट रोजी, तर वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण या दोन्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भिडत पाहायला मिळणार आहे. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा स्टार अरशद नदीम भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (27 ऑगस्ट) आमने सामने असतील.

सध्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पिनशिप स्पर्धा हंगरीची राजधानी बुडापेस्टमध्ये सुरू आहे. यात भालाभेप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्यासह भारताचे एकूण तीन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. नीरजसोबतच, डीपी मनू (81.31) आणि कोशोर जेना (80.55) हे भारतीय खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे. यातील नीरज चोप्रा पिजेतेपदासाठी दावेदार आहे. नीरजसमोर पाकिस्तानचा अरशद नदीम (Arshad Nadeem) याचे आव्हान असणार आहे. हे दोन्ही खेळाडू सुवर्ण पदकासाठी रविवारी लढताना दिसू शकतात.

रविवारी जागतिक ऍथलेटिक्सच्या चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेची क्वॉलिफायर फेरी पार पडली. नीरज आणि अरशद वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते. नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकिट पक्के केले. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खेळाडूंना 83 मीटर फाला टाकणे गरजेचे होते. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भाला फेकला आणि अंतिम सामन्यासाठी पात्र झाला. ग्रुप दोनमध्ये असलेल्या अरशद नदीम याने सुरुवात अपेक्षित केली नव्हती. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात चांगले पुनरागमन केले. पहिल्या प्रयत्नात त्याने 70 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 81.53 मीटर, तर तिसऱ्या प्रयत्नात 86.79 मीटर भाला फेकला. परिणामी अंतिम सामन्यात देखील पात्र झाला.

नीरज आणि अरशद 2018 आशियाई गेम्सपासून अनेकदा एकत्र खेळले आहेत. अशात दोघांमध्ये अनेकदा अंतिम फेरीत आमना सामना झाला. पण प्रत्येक वेळी नीरजने बाजी मारली. मागच्या वर्षी राष्ट्रकूल खेळाडूंमध्ये नीरज चोप्रा दुखापतीमुळे खेळला नाही. त्यावेळी अरशदला सुवर्ण पदक मिळाले होते. त्याने तब्बल 90 मीटर पेक्षा जास्त लांब भाला फेकत ही कामगिरी केली होती, जे अंतर नीरज चोप्रा याच्या सर्वोत्तम प्रदर्शनापेक्षाही जास्त आहे. अशात रविवारी जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपची अंतिम फेरी रोमांचक पद्धथीने पार पडण्याची पूर्ण शक्यता आहे. (Neeraj Chopra and Arshad Nadeem will meet in the javelin final at the World Athletics Championships.)

महत्वाच्या बातम्या –
अखेर बीसीसीआयचे ‘हे’ पदाधिकारी जाणार पाकिस्तानात! आशिया कप सामन्याला लावणार हजेरी
अलूरमध्ये सुरू झाला टीम इंडियाचा ट्रेनिंग कॅम्प! वाचा पहिल्या दिवशी काय घडले?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---