fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि जीन्सन जॉन्सन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि धावपटू जीन्सन जॉन्सन या दोघांची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात करण्यात आली आहे.

नीरजने एशियन गेम्समध्ये राष्ट्रीय विक्रम मोडत ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवले. तर जीन्सनने पण या स्पर्धेतील १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्ण आणि ८०० मीटरच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. तसेच यासंबंधीची अधिकृत घोषणा अजून करण्यात आली नाही.

तसेच या पुरस्कारासाठी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन धावपटू हिमा दास, महिला क्रिकेटर स्म्रीती मानधना, हॉकीपटू मनप्रीत सिंग आणि सविता पुनिया, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, बॅटमिंटनपटू एन सिक्की रेड्डी, बॉक्सर सतिश कुमार, गोल्फपटू शुभांकर शर्मा आणि एशियन गेम्समधील दुहेरीचा सुवर्ण पदक विजेता टेनिसपटू रोहन बोपन्ना यांचीही शिफारस करण्यात आली आहे.

याच बरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानूची संयुक्तरित्या देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात करण्यात आली आहे.

जर केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी विराटच्या नावाला मंजूरी दिली तर तो खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसराच क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१९९७) आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीला (२००७) खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २५ सप्टेंबरला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग

You might also like