प्रो कबड्डीत नीरज कुमारने केली ‘या’ मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी

पुणे| प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (15 सप्टेंबर) पुणेरी पलटण विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात 92 वा सामना रंगला. या सामन्यात पटना पायरेट्सने 55-33 असा दणदणीत विजय मिळवला. पटना पायरेट्सच्या या विजयात डिफेंडर नीरज कुमारने महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात तब्बल 11 टॅकल पॉइंट्स मिळवले. त्यामुळे त्याने प्रो कबड्डीच्या एका सामन्यात सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवण्याच्या मनजीत छिल्लरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

मनजीतने प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात एका सामन्यात 11 टॅकल पॉइंट्स मिळवण्याचा पराक्रम केला होता.

तसेच प्रो कबड्डीच्या एका सामन्यात सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणाऱ्या कबड्डीपटूंच्या यादीत मनजीत आणि नीरज पाठोपाठ सुरेंदर नाडा आहे. त्याने दुसऱ्या मोसमातील एका सामन्यात 10 टॅकल पॉइंट्स मिळवले होते.

रविवारी झालेल्या सामन्यात नीरजने एकूण 13 टॅकल केले होते. यामधील त्याचे 10 टॅकल यशस्वी झाले. यात एका सुपर टॅकलचाही सामावेश होता. तसेच त्याचे 3 टॅकलचे प्रयत्न अयशस्वी झाले.

प्रो कबड्डीमध्ये एकाच सामन्यांत सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू – 

11 – नीरज कुमार

11- मनजीत चिल्लर

10 – सुरेंदर नाडा

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रो कबड्डीत कोणालाही न जमलेला ‘तो’ विक्रम परदीप नरवालने करुन दाखवला!

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

You might also like

Leave A Reply