मानांकन टेनिस 2020 स्पर्धेत नील बोन्द्रे, सर्वज्ञ सरोदे, नीरज जोर्वेकर यांची विजयी सलामी

पुणे। दिलीप(अण्णा) वेडेपाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व आयकॉन ग्रुप यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए आयकॉन ग्रुप कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2020 स्पर्धेत मुलांच्या गटात नील बोन्द्रे, नीरज जोर्वेकर, पार्थ दाभीकर, वेदांग जोशी, तनिश पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

दिलीप वेडेपाटील स्पोर्ट्स अकादमी, बावधन येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील वर्षाखालील मुलांच्या गटात पार्थ दाभीकर याने यश सारस्करचा टायब्रेकमध्ये 5-4(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. नील बोन्द्रे व तनिश पाटील यांनी अनुक्रमे आरुष भामरे व अहाण जैन यांचा 5-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून विजयी सुरुवात केली.

सर्वज्ञ सरोदे याने आर्यन कोटणीसचा 5-2 असा तर, वेदांग जोशीने शौर्य बोऱ्हाडेचा 5-2असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हर्ष परिहार याने रौनील वर्माला 5-3असे पराभूत केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल।

पहिली फेरी।

10वर्षाखालील मुले।

श्रेयश गवारी वि.वि.सौम्य माहेश्वरी 5-1; नीरज जोर्वेकर वि.वि.कियान पौआ 5-1; पार्थ दाभीकर वि.वि.यश सारस्कर 5-4(5); नील बोन्द्रे वि.वि.आरुष भामरे 5-0; राघव सरोदे वि.वि.श्रीराज बराटे 5-1; आरुष पोतदार वि.वि.रुद्र पटवर्धन 5-2; रुद्र मेमाणे वि.वि.मनोन्मय शिंदे 5-2; वेदांग जोशी वि.वि.शौर्य बोऱ्हाडे 5-2; हर्ष परिहार वि.वि.रौनील वर्मा 5-3; तनिश पाटील वि.वि.अहाण जैन 5-0; आश्रित माज्जी वि.वि.अश्विन टेंबवलकर 5-0; सर्वज्ञ सरोदे वि.वि.आर्यन कोटणीस 5-2.

You might also like