---Advertisement---

नेपाळची क्रिकेट टीम करणार भारताचा दौरा, टीम इंडियाविरुद्ध मॅच खेळणार का?

Nepal-Cricket-Team
---Advertisement---

नेपाळच्या क्रिकेट संघानं अलीकडच्या काळात खूप सुधारणा केली आहे. संघानं नुकताच टी20 विश्वचषक 2024 मध्येही भाग घेतला होता. या स्पर्धेत नेपाळनं अनेक मोठ्या संघांना आव्हान दिलं होतं. या पार्श्वभूमीवर आता नेपाळचा संघ दोन आठवड्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेपाळचा संघ भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी येणार आहे का? तर तसं नाही. संघ एका विशेष कारणासाठी भारतात येणार आहे.

नेपाळचा क्रिकेट संघ दोन आठवडे भारतात राहणार आहे. या दरम्यान संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेईल. नेपाळचा या वर्षातील हा दुसरा भारत दौरा आहे. नेपाळनं यापूर्वी 2024 टी20 विश्वचषकच्या तयारीसाठी देखील भारताला भेट दिली होती. त्यावेळी संघाचं प्रशिक्षण शिबिर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तसेच नेपाळनं बडोद्याविरुद्ध काही सराव सामनेही खेळले होते.

नेपाळ एनसीए येथे क्रिकेट विश्वचषक लीग 2 मालिकेसाठी सराव करेल. याची घोषणा नेपाळ क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावर केली आहे. नेपाळची टीम सोमवारी (12 ऑगस्ट) भारताकडे रवाना झाली. बोर्डानं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “नेपाळचा संघ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मालिकेची तयारी करण्यासाठी भारताकडे रवाना झाला आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दोन आठवड्यांचं प्रशिक्षण आमच्या खेळाडूंना त्यांचं कौशल्य वाढवण्यास मदत करेल.”

 

या वर्षी मार्चमध्ये बीसीसीआयनं ‘फ्रेंडशिप कप’ नावाची त्रिकोणी मालिका आयोजित केली होती. या मालिकेत नेपाळचा संघ गुजरात आणि बडोदाविरुद्ध खेळला होता. नेपाळ संघानं स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही संघांना घरच्या मैदानावर पराभवाची चव चाखवली होती.

बीसीसीआय नेपाळ आणि अफगाणिस्तान या संघानं भरपूर मदत करत आहे. या दोन देशांकडे क्रिकेटच्या तयारीसाठी भारताइतकी संसाधनं नाहीत. पुढील महिन्यात अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, ज्याचं आयोजन भारतात केलं जाणार आहे.

हेही वाचा – 

“विराट कोहलीमुळेच क्रिकेटचा 2028 ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला!”
मोठी बातमी! विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, अन्य वरिष्ठ खेळाडूंनाही खेळण्यास सांगितलं
कॅरेबियन पॉवर! षटकार अन् तोही 113 मीटर लांब….चेंडू पुन्हा दिसलाच नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---