इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या अंतीम सामन्याला अवघे 14 दिवस उरले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळत असून जसजसे दिवस जवळ येत आहेत चाहत्यांची उत्सुकता देखील वाढत आहे. शनिवारी सनरायजर्स हैद्राबाद वि. लखनऊ सुपर जायंट्स यांचा सामना खेळवला गेला झाला. शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान लखनऊच्या खेळाडूंना प्रेक्षकांकडून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये उत्साह असला, तरी गदारोळ हा होतोच. शनिवारी झालेल्या सनरायझर्स वि. लखनऊ यांच्यात असाच काहीसा सामना पहायला मिळाला. या सामन्यावेळी जल्लोष तर झालाच, पण पण गदारोळही झाला. एलएसजी प्रशिक्षकाने खुलासा केला की प्रेरक मंकडवर SRH चाहत्यांनी हल्ला केला. मंकडला नट आणि बोल्टने मारण्यात आले. मंकड हा तोच खेळाडू आहे जो या सामन्यात हिरो ठरला. सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगते की, ज्याचा सामन्यात सर्वांत मोठा वाटा आहे अशाच खेळाडूला प्रेक्षकांनी नट बोल्ट फेकून का मारले असतील? चला तर या घडल्या प्रकारावर एक नजर टाकू.
क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाने केला खुलासा
सर्वांत आधी असे समोर आले की, हैद्राबादचे चाहते लखनऊ सुपर जायंट्सच्या डगआउटवर निशाना साधत होते. मात्र, काही वेळानंतर असे लक्षात आले की, ते लखनऊच्या खेळाडूवर निशाना साधत नट आणि बोल्टचा मारा करत आहेत. घडलेल्या घटनेबाबत लखनऊचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी रोड्स याने ट्वीट केले आहे. जेव्हा ही गोष्ट सर्वांना समजली तेव्हा मैदानावर एकच गोंधळ उडाला. लखनौचे सपोर्ट स्टाफ आणि पंच यांच्यात देखील बाचाबाची झाली. या वादाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
Not at the dugout, but at the players. They hit Prerak Mankad on the head while he was fielding at long on. #noton https://t.co/4yxmuXh7ZF
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) May 13, 2023
खेळाची आकडेवारी पाहूयात
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जायंट्सने 4 चेंडूत 7 गडी राखून सामना आपल्या नावावर केला. लखनौच्या या विजयाचा हिरो ठरला प्रेरक मंकड. 45 चेंडूत 64 धावांच्या नाबाद खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या हंगामातील प्रेरक मंकडचा हा दुसराच सामना होता. (New information received from Jonty Rhodes about the attempt by the spectators to harm the player of the match, Prerak Mankad )