---Advertisement---

मोठी बातमी! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, स्वत: केली घोषणा

New-Zealand
---Advertisement---

न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं पुष्टी केली आहे, की सध्या सुरू असलेला टी20 विश्वचषक हा त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा असेल.

शनिवारी (15 जून) न्यूझीलंडनं युगांडावर 9 गडी राखून विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बोल्ट म्हणाला, “मला एवढंच सांगायचं आहे की, हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल.” बोल्ट न्यूझीलंडसाठी खेळणं सुरू ठेवेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. तो 2022 मध्ये केंद्रीय करारातून बाहेर पडला होता. त्याऐवजी त्यानं जगभरातील टी20 फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रेंट बोल्टनं 2011 मध्ये न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो किवी संघाच्या ‘गोल्डन जनरेशन’चा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. त्यानं न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तो 2014 पासून 4 टी20 विश्वचषकांमध्ये खेळला आहे.

युगांडावर मोठा विजय मिळवूनही न्यूझीलंडचा संघ टी20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडला आहे. ‘क’ गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. आता 17 जून रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध न्यूझीलंडचा शेवटचा साखळी सामना हा 34 वर्षीय बोल्टचा टी20 विश्वचषकातील शेवटचा सामना असेल.

ट्रेंट बोल्टनं 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडसाठी पहिला टी20 सामना खेळला होता. त्यानं किवी संघासाठी 60 टी20 सामन्यांमध्ये 81 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 21.79 आणि इकॉनॉमी रेट 7.76 एवढा राहिला. 13 धावा देऊन 4 बळी ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“उमर अकमलचे आकडे विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत”, पाकिस्तानच्या माजी फलंदाजानं तोडले अकलेचे तारे
सुपर-8 मध्ये पोहचताच अफगाणिस्तानला धक्का, संघाचा स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बनला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---