मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हटले की, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. कारण षटकांची मर्यादा असल्याने फलंदाज आक्रमक होऊन जबरदस्त फटकेबाजी करतात. तर गोलंदाजही कमीतकमी धावा देत विकेट्स काढण्याचा प्रयत्न करतात. फलंदाज-गोलंदाजांच्या या लढतीमुळे सामन्याला अजून जास्त रंगत चढते. परंतु एका सामन्यात एका फलंदाजाने विरोधी संघाला चांगलेच थकवले. त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडत अवघ्या २० चेंडूत झुंजार शतक लगावले. हा फलंदाज म्हणजे, न्यूझीलंडचा २१ वर्षीय फिन ऍलेन.
न्यूझीलंडमध्ये सध्या अ दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेतील फोर्ड ट्रॉफीचा थरार चालू आहे. या स्पर्धेच्या दहाव्या फेरीतील एक सामना रविवारी (२८ फेब्रुवारी) वेलिंग्टन फायरबर्ड्स विरुद्ध ऑटॅगो वोल्ट्स संंघात झाला. या सामन्यात वेलिंग्टन संघाचे प्रतिनिधित्त्व करताना ऍलेनने १२८ धावांची अफलातून खेळी केली. अवघ्या ५९ चेंडूत त्याने ही धावसंख्या उभारली.
यादरम्यान ११ खणखणीत षटकार आणि ९ चौकार त्याने मारले. म्हणजे, चौकार-षटकारांसह त्याने १०२ धावा केल्या आणि फक्त २६ धावा पळून काढल्या. विशेष म्हणजे, ५० चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने प्रत्येकी ८ षटकार आणि चौकार मारत त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमधील आपले पहिले शतक पूर्ण केले आहे.
Finn Allen brings up his first hundred for @cricketwgtninc in 50 balls. Yes 50 balls. 8 fours and 8 sixes at the @BasinReserve against the @OtagoVolts. Watch play LIVE here | https://t.co/dLqbBQMOYG #FordTrophy pic.twitter.com/FBcYfOAjwR
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 28, 2021
फिन ऍलेनच्या खेळीमुळे वेलिंग्टन संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ४२७ धावा केल्या. ऍलेनव्यतिरिक्त टीए ब्लंडेलनेही दीडशतकी धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ऑटॅगो वोल्ट्स संघाचा एकटा फलंदाज ८४ धावा करू शकला. परिणामत ४१.२ षटकात ३४२ धावांवर त्यांचा पूर्ण संघ गारद झाला आणि वेलिंग्टननने ८२ धावांनी सामना खिशात घातला.
दुर्दैवाची बाब अशी की, याच ऍलेनला इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामात कुणीही वाली मिळाली नव्हता. परंतु त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील कामगिरी पाहता नक्कीच येत्या टी२० विश्वचषकावेळी त्याला न्यूझीलंड संघात दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, वाचा त्याची कहाणी
मोहम्मद सिराज की उमेश यादव? चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या जागी ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी
फक्त आणि फक्त क्रिकेट! मार्च महिन्यात रंगणार तब्बल ‘इतके’ क्रिकेट सामने, दर दिवसाआड होणार मॅच