मंगळवारी (24 जानेवारी) भारतीय फलंदाजांनी इंदोरच्या होळकर स्टेडियवर वादळी खेळी केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाणेफेक जिंकू शकला नाही. पण संघ प्रथम फलंदाजीला आल्यानंतर संघाला रोहितने वेगवान सुरुवात मात्र मिळवून दिली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Shubman gill) यांनी वैयक्तिक शतके ठोकत संघाची धावसंख्या उंचावली. या दोघांनी विकेट गमावल्यानंतर मात्र संघाचे फलंदाज अपेक्षित खेळी करू शकले नाहीत. असे असले तरी भारताने पाहुण्या इंग्लंड संघाला विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले.
Innings Break!
A mighty batting display from #TeamIndia! 💪 💪
1⃣1⃣2⃣ for @ShubmanGill
1⃣0⃣1⃣ for captain @ImRo45
5⃣4⃣ for vice-captain @hardikpandya7Over to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/ojTz5RqWZf#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/JW4MXWej4A
— BCCI (@BCCI) January 24, 2023
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात 85 चेंडूत 101 धावा केल्या, तर शुबमन गिल (Shubman Gill) याने 78 चेंडूत 112 धावा केल्या असत्या. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी द्विसतकीये भागीदारी केल्यामुळे संघाला जबरदस्त सुरुवात मिळाली. मात्र, रोहितने 27 व्या षटकात विकेट गमावल्यानंतर संघान विकेट गमवायला सुरुवात केली. रोहित मायकल ब्रेसवेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर शुबमन गिल 28 व्या षटकात ब्लेअर टीकनर याच्या चेंडूवर झेलबाद झाला. न्यूझीलंडसाठी टिकनरने 10 षटकात 76 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या.
रोहितने विकेट गमावल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आला. विराटकडून मोठ्या खेलीची अपेक्षा होती. मात्र, त्याला 36 धावांवर समाधान मानावे लागेल. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने अनुक्रमे 17 आणि 14 धावा करून विकेट गमावली. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने संघासाठी अर्धशतकीय योगदान दिले. हार्दिकने 38 चेंडूत 54 धावा कुटल्या. गोलंदाजी विभागात जॅकोब डफे (Jacob Duffy) याने 100 धावा खर्च करून टीकरप्रमाणे तीन विकेट्स घेतल्या. तर मायकल ब्रेसवेलने 6 षटकात 51 धावा खर्च करून एक विकेट घेतली. (New Zealand need 386 runs to win the third ODI against IND )
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
यत्र तत्र सर्वत्र शुबमन गिल! 2022 पासूनचे आकडे पाहून नक्कीच वाटेल अभिमान