टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 झाल्यानंतर अनेक संघांमध्ये बदल दिसायला सुरूवात झाली आहे. त्याचा परिणाम न्यूझीलंडवरही झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने मंगळवारी (15 नोव्हेंबर) संघ जाहीर केले. ज्यामधून दोन दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे. कर्णधारपद केन विल्यमसनकडे कायम आहे. तो वनडे आणि टी20 या दोन्ही मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आणि तेवढ्याच सामन्याची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यासाठी बोर्डने 13-13 सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा केन विल्यमसन (Kane Williamson) याच्याकडे सोपवली असून संघात सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांना जागा मिळाली नाही.
न्यूझीलंडने नुकतेच टी20 विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये गप्टिलच्या जागी फिन ऍलन याला खेळवले आणि आता पुन्हा एकदा त्याला भारताविरुद्धच्या मालिकांसाठी निवडण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात गप्टिलला संधी मिळणार की नाही अशी शंका निर्माण होते. दुसरीकडे बोल्टने वार्षिक करारच मोडला असून तो आता कुंटुबासोबत वेळ व्यतित करणार. त्याचबरोबर तो विदेशी लीगमध्ये खेळण्याची शक्यताही अधिक आहे.
Our squads to face India in three T20I's & three ODI's starting on Friday at @skystadium 🏏
Details | https://t.co/OTHyEBgKxQ#NZvIND pic.twitter.com/2Ov3WgRJJt
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 14, 2022
या मालिकेसाठी भारताचे काही खेळाडू न्यूझीलंडला पोहोचले असून टी20 मालिकेत संघ हार्दिक पंड्या आणि वनडे मालिकेत शिखर धवन यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. (New Zealand Team Announced For T20 and ODI Series Against India)
न्यूझीलंड टी20 संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर
न्यूझीलंड वनडे संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन
शाहीन आफ्रिदीची दुखापत गंभीर आहे की नाही? पीसीबीने स्वतः दिली माहिती