Loading...

या कारणामुळे केन विलियम्सन, अकिला धनंजया सापडले अडचणीत, आयसीसी घेणार निर्णय

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात 14-18 ऑगस्ट दरम्यान गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यातील न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजया यांची गोलंदाजी शैली संशयित असल्याचा रिपोर्ट सामनाधिकाऱ्यांनी आयसीसीला दिला आहे.

तसेच हा रिपोर्ट न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघाच्या व्यवस्थापनाकडेही सोपवण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही खेळाडूंच्या गोलंदाजी शैलीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे आता विलियम्सन आणि धनंजया या दोघांच्या गोलंदाजी शैलीची तपासणी ही आयसीसीच्या कसोटी, वनडे आणि टी20तील संशयित गोलंदाजी शैली संबंधी प्रक्रियेअंतर्गत करण्यात येईल.

त्यासाठी त्यांना 18 ऑगस्टपासून पुढील 14 दिवसांमध्ये चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. पण या दरम्यान या चाचणीचा निकाल येईपर्यंत या दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या सामन्यात विलियम्सनने 3 षटके गोलंदाजी केली होती. तर धनंजयाने 62 षटके गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने मिळवलेल्या विजयात धनंजयाने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 1 अशा 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व

मोठी बातमी- ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर

विराट कोहलीचे अव्वल स्थान धोक्यात; स्टिव्ह स्मिथची क्रमवारीत मोठी झेप

You might also like
Loading...