T20 World Cupक्रिकेटटॉप बातम्या

टीम इंडियाच्या विजयानंतर जय शहांचा आनंद गगनात मावेना! केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा VIDEO

टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आणखी एक किर्ती रचला आहे. काल (9 जून) रोजी झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली टीम इंडियाने पाकिस्ताला 6 धावांनी मात दिली आहे. विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी हटके सेलिब्रेशन केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यांसाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांसह माजी दिग्गज खेळाडू, संपूर्ण भारतीय संघातील खेळाडूंची फॅमिली, तसेच बीसीसीआयचे अधिकारी देखील सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते.

टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शहांनी अनोखे सेलिब्रेशन केले. ज्यामध्ये ते उभे राहून हात वारे करताना दिसले. 

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. पण सामना पूर्ण 20 षटकांचा खेळवला गेला. पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली सलामी दोन्ही फलंदाज सवस्तात बाद झाले त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रिषभ पंत आणि अक्षर पटेल दोघांनी मिळून टीमला सन्मानजनक धावसंख्या उभा करण्यात मोलाचे योगदान दिले, भारतीय संघाने 119 धावांचा लक्ष्य पाकिस्तान समोर ठेवला.

भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्या समोर पाकिस्तान संघाचा टिकाव लागला नाही. पाकिस्तान संघ 113 धावाच काढू शकली आणि भारताने हा सामना 6 धावांनी आपल्या नावे केला. जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत कमालच केली, त्याने 4 षटकात केवळ 14 धावा देत 3 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

महत्तवाच्या बातम्या-

सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?
शिवम दुबेचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! रिंकूला संघात न घेणं पडणार महागात?
‘जागा बदलली पण निकाल तोच’, लाजिरवाण्या पराभवानंतर मास्टर ब्लास्टरने पाकिस्तानला डिवचलं; म्हणाला…

Related Articles