---Advertisement---

IPL 2025; गतविजेत्यांचा दारुण पराभव! आरसीबीनं फोडला विजयाचा नारळ

---Advertisement---

RCB VS KKR राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आयपीएल 2025 च्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. हंगामाच्या पहिल्या सामन्यात आरसीबीनं गतविजेत्या केकेआरला 7 विकेट्सनं मात दिली. (RCB WON BY 7 WICKETS)

केकेआरने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीच्या सलामी जोडीने आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 8.3 षटकांत 95 धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पण 95 धावांवर फिलीप साल्टच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहली (59 धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (34 धावा) यांनी संघाला सावरले. शेवटी 16.2 षटकात विराट कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी संघाला विजय मिळवून दिला. (VIRAT KOHLI 59* RUNS)

हंगामच्या पहिल्याच सामन्यात आरसीबाने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजांकडून प्रथम गोलंदाजी करताना केकेआर सारख्या बलाढ्य संघाला 175 धावांत रोखले, गोलंदाजीत कृणाल पांड्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, शिवाय जोश हेझलवूडनेही 2 विकेट्स घेतल्या. तर केकेआरकडून अजिंक्य रहाणेने 56 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. (RCB ALLROUND PERFORMANCE)

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराटने 59 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिली. तत्तपूर्वी फिलीप साल्टने 56 धावांची वादळी खेळी करत सामना आरसीबीच्या पारड्यात आणला. मात्र तो 56 धावांवर बाद झाला, त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. यानंतर देवदत्त पडिक्कलने 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर चाैथ्या क्रमाकावर आलेल्या रजत पाटीदार 34 धावांची वादळी खेळी खेळत संघाला विजायाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, तो 34 धावांवर बाद शेवटी लियाम लिव्हिंगस्टोनने सलग चाैकर खेचत सामना 16.2 षटकात आरसीबीच्या नावे केला. आशाप्रकारे आरसीबीने आयपीएल 2025च्या हंगामात विजयी सुरुवात केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---