क्रिकेटटॉप बातम्या

इंग्लंड मालिकेपूर्वी नितीश रेड्डी तिरुपती मंदिरात, गुडघ्यावर पायऱ्या चढले; पाहा VIDEO

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये नितीश कुमार रेड्डीचेही नाव आहे. नितीश रेड्डीने 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मेलबर्न कसोटीत त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते, त्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. आता नितीशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने इंग्लंड मालिकेपूर्वी अलीकडेच तिरुपती मंदिराला भेट दिली. नितीश गुडघ्यावर पायऱ्या चढला आणि भगवान वेंकटेश्वरांचे आशीर्वाद घेतले. नितीशने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा भक्तीपर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तिरुपती मंदिरात एकूण 3550 पायऱ्या आहेत ज्या 12 किलोमीटर अंतर व्यापतात.

नितीश कुमार रेड्डी 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा आणि दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने 9 डावात 37.25 च्या सरासरीने 298 धावा केल्या. ज्यामध्ये एका शानदार शतकाचाही समावेश होता. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात नितीशने 189 चेंडूत 60.31 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या. ज्यामध्ये 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार) , रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर

हेही वाचा-

664 ची सरासरी, 5 शतके! विजय हजारे स्पर्धेत स्टार खेळाडूचा धुमाकूळ, टीम इंडियात कमबॅक करणार?
Champions trophy 2025; या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, मोठी अपडेट समोर
Kho-Kho WC 2025; टीम इंडियाची विजयी सलामी, रोमांचक सामन्यात नेपाळला लोळवलं

Related Articles