Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वचषकाच्या सलामीलाच यजमान ऑस्ट्रेलिया पस्त! न्यूझीलंडचा 89 धावांनी दणदणीत विजय

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 (2022 T20 World Cup Super 12) फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मुख्य फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड (AUSvNZ) यांच्यादरम्यान सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने मागील विश्वचषकातील अंतिम सामन्याच्या पराभवाचे उट्टे काढत ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली.

A winning start to the @T20WorldCup at the @scg! Tim Southee 3-6, Mitch Santner 3-31 and Trent Boult 2-24. Scorecard | https://t.co/B2xf1USee1 #T20WorldCup pic.twitter.com/tHDK8Erz1W

— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2022

 

विश्वचषकाचे दावेदार म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात धमाकेदार सुरुवात केली. युवा सलामीवीर फिन ऍलनने 16 चेंडूंवर 42 धावांची खेळी केली. केन विलियम्सन व ग्लेन फिलिप्स हे देखील उपयुक्त योगदान देत माघारी परतले. अखेरीस अष्टपैलू जिमी निशामने 13 चेंडूत 26 धावा चोपल्या. मात्र, सलामीवीर कॉनवेने 58 चेंडूंवर 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड 20 षटकात 3 बाद 200 धावा बनवण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियासाठी जोस हेजलवूडने दोन बळी आपल्या नावे केले.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात 201 धावांचा पाठलाग करताना अतिशय खराब झाली‌. डेव्हिड वॉर्नर केवळ पाच धावा करून बाद झाला. कर्णधार ऍरॉन फिंच व मिचेल मार्श हे चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकले नाहीत. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड व टीम डेव्हिड हे देखील संघासाठी फारसा योगदान देऊ शकले नाहीत. बराच वेळ अडखळत खेळत असलेला ग्लेन मॅक्सवेल 28 धावांवर बाद झाला. ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचे अखेरचे फलंदाज झटपट गुंडाळत ऑस्ट्रेलियाचा डाव 111 धावांवर संपवला. न्यूझीलंडसाठी मिचेल सॅंटनर व‌ टीम साऊदी यांनी प्रत्येकी दोन तर ट्रेंट बोल्टने दोन बळी मिळवले. शानदार 92 धावांची खेळी करणारा डेवॉन कॉनवे सामनावीर ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!


Next Post
ishan kishan

देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक

Pakistan-Team

महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम

Aus-vs-NZ

हे काय बरं नाही! ऑस्ट्रेलियाला विजयापेक्षा पराभव जास्त जवळचा, मोडला स्वत:चाच नकोसा विक्रम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143