ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना खेळला गेला. आपला अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात न्यूझीलंडने एकतर्फी बाजी मारली. आयर्लंडवर 35 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंड या विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला. मात्र, 2015 पासून न्यूझीलंडचे सातत्याने आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व राहिले आहे.
New Zealand become the first team to qualify for the #T20WorldCup 2022 semi-finals 🔥
— ICC (@ICC) November 4, 2022
उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रात्यक्षिक करत आयर्लंडला 35 धावांनी नमवले. यासोबतच तो या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ बनला. केन विलियम्सनच्याच नेतृत्वात या संघाने मागील वर्षी टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.
आयसीसीने आयोजित केलेल्या 2015 पासूनच्या सर्व स्पर्धांमध्ये न्यूझीलंड हा सर्वात सातत्यपूर्ण संघ ठरला आहे. 2015 मध्ये न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केल्या गेलेल्या वनडे विश्वचषकात त्यांनी अंतिम फेरीत मजल मारलेली. त्यावेळी संघाला ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. 2016 टी20 विश्वचषकात त्यांनी आपल्या गटामध्ये अव्वल स्थान मिळवत उपांत्य फेरीत जागा पटकावलेली. मात्र, इंग्लंडने त्यांचा पराभव करत अंतिम फेरीचे स्वप्न तोडले होते. याच स्पर्धेत केन विलियम्सन संघाचा कर्णधार म्हणून प्रथम सहभागी झाला होता. 2017 चॅम्पियन ट्रॉफी उपांत्य सामन्यात पाकिस्तानने त्यांना पराभवाचा धक्का दिलेला.
इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या 2019 वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी देखील त्यांनी केली. मात्र, ते या विश्वचषकात कमनशिबी ठरले व सुपर ओवरमध्ये ही सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित केले गेले. 2021 मध्ये त्यांनी आपल्या आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याची कामगिरी केली. परंतु, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी न्यूझीलंड विजेतेपद पटकावणार की पुन्हा चोक होणार हे लवकरच समजेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय
हॅट्ट्रीक! आयर्लंडच्या जोशुआ लिटलने उधवस्त केली न्यूझीलंडची मिडल ऑर्डर, ठरला सहावाच गोलंदाज