---Advertisement---

क्रिकेटवर कोरोनाची पुन्हा वक्रदृष्टी! न्यूझीलंडच्या धडाकेबाज सलामीवीराचा अहवाल आला पॉझिटिव

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 11:31 PM
finn allen
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ ढाका येथे पोहोचला आहे. मात्र, बांगलादेशमध्ये आगमन होताच न्यूझीलंड संघासाठी एक वाईट बातमी समोर आली. संघाचा युवा सलामीवीर फिन ऍलन याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून, त्याला इतर संघापासून स्वतंत्ररीत्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची अधिकृत माहिती दिली.

न्यूझीलंड खेळणार बांगलादेशमध्ये मालिका
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान १ सप्टेंबरपासून ढाका येथे पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सोमवारी बांगलादेशमध्ये दाखल झाला. न्यूझीलंड संघातील बहुतांशी खेळाडू इंग्लंडमार्गे बांगलादेशमध्ये आले आहेत.

फिन ऍलन कोरोनाबाधित
न्यूझीलंडचा युवा सलामीवीर फलंदाज फिन ऍलन हा इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये बर्मिंघम फिनिक्स संघाचा भाग होता. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर तो बांगलादेशकडे रवाना झाला. इंग्लंडमधून निघण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती. मात्र, बांगलादेशमध्ये आल्यावर ४८ तासानंतर झालेल्या चाचणीत त्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे त्याला तात्काळ संघापासून इतरत्र  ठेवण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य आरोग्य अधिकारी व न्यूझीलंड संघाचे मुख्य डॉक्टर मॅकह्युज त्याच्यावर लक्ष ठेवतील.

आयपीएलमध्ये होता आरसीबीचा भाग
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-सलामीवीर असलेला ऍलन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी त्याला करारमुक्त करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या द हंड्रेड लीगमध्येत्याने बर्मिंघम फिनिक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. बर्मिंघम संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत सदर्न ब्रेव्ह संघाकडून पराभव पत्करावा लागला.

बांगलादेश दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ-
टॉम लॅथम ( कर्णधार), फिन‌ ऍलन, विल यंग, हेन्री निकोल्स, कोल मॅकोन्ची, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडल, एजाज पटेल, बेन सिअर्स, ब्लेर टिकनर, डग ब्रेसवेल, स्कॉट कुगलीन, हामिश बेनेट व जेकब डफी.

महत्त्वाच्या बातम्या-

है तैयार हम! लीड्स कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांची तयारी पूर्ण, पाहा व्हिडिओ

ज्याची भिती तेच झाले! अफगाणिस्तान वि. पाकिस्तान वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित

आयसीसी स्पर्धांमध्ये ‘या’ संघांचे आहे वर्चस्व, सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---