भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघात सध्या ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ब्रायन लारा स्टेडियम येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने वनडेमधील वर्चस्व कायम ठेवले. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६८ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने प्रतिक्रिया दिली.
सामना हरल्यानंतर पूरन म्हणाला की, “हे निराशाजनक आहे. आमचे खेळाडू दु:खी आहेत. मालिकेतील हा पहिलाच सामना होता आणि आता आम्ही पुढच्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विचार करत आहोत. त्यांनी (भारतानी) १८ षटकांत १५० धावा केल्या, तेव्हा सामना आमच्यापासून दूर नेला असे मला वाटते. फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आता आम्हाला पुढील सामन्यात संयोजनाकडे थोडेफार लक्ष द्यावे लागेल.”
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १९१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १२२ धावा करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ६४ धावांची खेळी केली. शिवाय दिनेश कार्तिकने सामन्यातील सर्वोत्तम अशी १९ चेंडूत ४१ धावांची खेळा केली. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. मात्र, त्यापुढे गोलंदाजांनी सामन्याची सूत्र हातात घेत आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने विंडीीजला पहिला झटका दिला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार अन् जडेजाने पॉवरप्लेमध्ये प्रत्येकी १ विकेट घेत. वेस्ट इंडिज संघाला तीन झटके दिले. त्यानंतर कोणत्याच क्षणी वेस्ट इंडिजचा संघ सामन्यात परतू शकला नाही.
दरम्यान, या मालिकेतील दुसरा सामना टी२० सामना सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी वॉर्नरपार्क या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ बदला घेण्याच्या हेतूने उतरणार असून भारतीय संघ मालिकेत असलेली १-०ची आघाडी आणखी मजबूत करण्याच्या हिशोबाने उतरेल. त्यामुळे हा सामना पाहण्याचा रोमांच उच्च स्थानी असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO | शून्यावर बाद झालेल्या ‘अय्यर’ला मिळायलाच हवे ‘या’ चार धावांचे श्रेय!
टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू मैदानात उतरण्यासाठी सज्ज, अमित मिश्राने शेअर केली आनंदवार्ता!
कार्तिकच्या अंगात संचारली ‘कॅरेबियन पॉवर!’ विंडीज संघाविरुद्ध ‘एवढ्या’ स्ट्राईक रेटने केल्या धावा