आयपीएलच्या मागच्या हंगामात आणि आयसीसी टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडीजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने निराशाजनक प्रदर्शन केले होते. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने १०.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
यावर्षी निकोलस पूरन (Nicholas Pooran) आयपीएलमध्ये खेळणारा वेस्ट इंडीजचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. क्रिकइंफोशी बोलताना त्याला प्रश्न विचारला गेला की, तुझ्यावर कसल्याही प्रकारचे दडपण आहे का ? त्यावर उत्तर देताना पूरन म्हणाला, “एका प्रोफेशनल क्रिकेटरच्या रूपात कधी कधी असे होते, खासकरून जेव्हा तुम्ही चांगले प्रदर्शन करत नसाल. अशा वेळी मीडिया तुम्हाला लक्ष्य करते आणि चाहतेही तुमच्यावर टीका करतात. पण एका प्रोफेशनल खेळाडूच्या रूपात तुम्हाला यातून बाहेर येऊन संघासाठी खेळायचे असते.”
आगामी हंगामात स्वतःला सिद्ध करावे लागेल असे तुला वाटते का? या प्रश्नाचेही पूरनने उत्तर दिले. तो म्हणाला, “नाही असे नाहीय. फक्त एक हंगाम खराब गेल्यामुळे मी खेळाडूच्या रूपात बदलणार नाही. मी आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात खूप चांगले प्रदर्शन करत आहे आणि सर्वजण हे पाहत आहेत. सनरायझर्सने माझ्यावर पैसे गुंतवले आहेत आणि मी चांगले प्रदर्शन करून त्याची परतफेड करू इच्छितो. आता मी आधीपेक्षा चांगला खेळाडू आहे आणि मागच्या हंगामातून खूप काही शिकलो आहे.”
पूरनच्या मते त्याने मागच्या काही सामन्यांमध्ये स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. तो म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूला काही ना काही तांत्रिक अडचणी असतात, पण माझ्यासाठी त्या मानसिक अधिक आहे. एकदा जर मी माझ्या झोनमध्ये दाखल झालो, तर सर्वकाही चांगले होईल. मागच्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये मी त्या माइंडसेटमध्ये गेलो आहे, ज्यामुळे माला माहिती आहे की, मला काय करायचे आहे. आशा आहे की, हे प्रदर्शन कायम राहील आणि लोक असे म्हणणे बंद करतील की, मला अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे.”
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जिंकली पहिली वनडे; मालिकेतही घेतली आघाडी
बरोबर १५ वर्षांपुर्वी १२७ किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पाहा व्हिडिओ
मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’