भारतीय संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी शुबमन गिलला नाही तर, एका दुसऱ्या खेळाडूला भारताचा पुढचा मर्यादित षटकांचा कर्णधाराच्या स्वरूपात निवडले आहे. सध्या शुबमन गिल भारताचा लिमिटेड षटकातील संघाचा उपकर्णधार आहे. आणि त्याला भविष्यातील कर्णधाराच्या रूपात सर्व बघत आहेत. या जबाबदारीसाठी कपिल देव स्टार भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याला सर्वोत्तम खेळाडू मानतात.
टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये त्यांच्या कर्णधारामध्ये बदल करण्यासाठी दबाव आणला जात होता. रोहितने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला किताब जिंकून दिला. तसेच 2027 च्या वर्ल्डकपमध्येही तो भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडकर्त्यानी शुबमन गिलची व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. तसेच पुढच्या कर्णधारपदासाठी त्याला तयार केले जात आहे. गिल 2026 मध्ये नवा टी20 आंतरराष्ट्रीय कर्णधार आणि 2027 मध्ये नवा फुल टाइम व्हाइट बॉल कर्णधार ठरू शकतो.
दिग्गज कपिल देवने यांनी जबाबदारीसाठी शुबमनच नाव निवडलं नाही. त्यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले, माझ्या हिशोबाने हार्दिक पांड्या माझा व्हाईट बॉल कर्णधार आहे. या पदासाठी अनेक दावेदार आहेत, पण हार्दिक पांड्या माझी निवड आहे.
हार्दिक पांड्याला रोहितच्या जागी भारताचा टी20 कर्णधार म्हणून कदाचित निवडले जाऊ शकते, असे वाटत होते. पण असे झाले नाही. निवडकर्त्यांनी या पदासाठी सूर्यकुमार यादवची निवड केली. हार्दिक व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये रोहितचा सहाय्यक होता. त्याने 2023 मध्ये एका वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व देखील केल आहे. तसेच 2023 वनडे वर्ल्ड कप आणि 2024 टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा तो उपकर्णधार ठरला.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. स्टार ऑलराऊंडर आयपीएल 2024 आधी मुंबईने नवा कर्णधार नियुक्त केला होता. भारताचा कसोटी उपकर्णधार जसप्रीत बुमराह देखील या संघात आयपीएल खेळत आहे.