वीरेंद्र सेहवागने जरी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असलेला दिसून येतो. तो ट्विट वेगळ्या विषयांवर करताना दिसून येतो. अनेकदा तो क्रिकेटपटूंवर टीका करताना, कधी क्रिकेटपटूंचे कौतुक करतानाही दिसतो. नुकतेच त्याने आरसीबी संघाच्या एबी डिविलियर्सच्या खेळीचे कौतुक अनोख्या पद्धतीने केले आहे.
वीरेंद्र सेहवागला आवडली एबी डिविलियर्सची खेळी
शुक्रवारी(९ एप्रिल) आयपीएल २०२१ हंगामात झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील एबी डिविलियर्सच्या खेळीचा सेहवाग चाहता झाला आहे. त्याने म्हटले आहे की, त्याची खेळी बेंगलोरला जिंकण्यास मदतगार ठरली. डिविलियर्सने या सामन्यांत तुफानी खेळ करत बेंगलोरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
सेहवाग ट्विटमध्ये म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेचा लोगो एबी डिविलियर्सला लक्षात घेऊनच बनवला आहे, यात काही आश्चर्य नाही.’ यावेळी सेहवागने हर्षल पटेलचे पण अभिनंदन केले. हर्षल पटेलने बेंगलोरकडून गोलंदाजी करताना ५ बळी घेतले आहेत.
Will power = De villiers Power.
Defeats all power.No wonder the @IPL logo is secretly designed after @ABdeVilliers17 . Champion knock. But Patel Bhai ke raaz mein , RCB bowling mazaa aaya. Top spell 5/27. Is saal cup aande , no vaandey. #RCBvsMI pic.twitter.com/NcPBRzaRrd
— Virender Sehwag (@virendersehwag) April 9, 2021
बेंगलोरने जिंकला सामना
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने १९ तर ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. यासोबतच ईशान किशनने २८ धावा केल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने १६० धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने ४ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माही’भाई विरुद्ध नाणेफेकीस उभारणे माझ्यासाठी खास क्षणांपैकी एक, कर्णधार पंतचे मोठे विधान
व्हिडिओ: ‘मॅक्स’भाऊचा तब्बल १०० मीटर अंतरावर खणखणीत षटकार, कॅप्टन कोहलीची रिऍक्शन होती लक्षवेधी
कमालचं! भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्रिटीश शहरात आयपीएल बनला निवडणुकीचा मुद्दा