क्रिकेटटॉप बातम्या

IPL 2025; केएल राहुल नाही तर हा खेळाडू होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? यावरून अजून शिक्कामोतर्ब झालेला नाही. रिषभ पंतच्या जाण्यानंतर संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलसह कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना रिटेन केले होते. यानंतर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात, त्यांनी केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस सारख्या अनुभवी खेळाडूंना खरेदी केले जे संघाचे कर्णधार बनू शकतात. राहुलने गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले होते. तर फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व केले होते. पण डीसी या दोघांनाही दुर्लक्ष करून अक्षर पटेलला कर्णधार बनवण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसते.

एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सूत्राने हे स्पष्ट केले आहे. अक्षर पटेल यावर्षी दिल्लीचे नेतृत्व करेल. अक्षर पटेल 2019 पासून दिल्ली संघासोबत आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत तो अनेक वेळा संघाचे नेतृत्व करताना दिसला आहे.

अक्षर पटेलच्या कर्णधारपदामुळे केएल राहुल विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात राहील. गेल्या हंगामापर्यंत आरसीबीचा कर्णधार असलेल्या फाफ डु प्लेसिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे रंजक राहील.

यंदाच्या मेगा लिलावानंतर सहमालक पार्थ जिंदल या बोलताना म्हणाले होती की,  “कर्णधारपदाबद्दल बोलणे आताच घाईचे ठरेल. अक्षर पटेल बऱ्याच काळापासून फ्रँचायझीसोबत आहे आणि गेल्या हंगामात तो उपकर्णधार होता, त्यामुळे अक्षर असेल की दुसरा कोणी असेल हे आम्हाला माहित नाही.”

बीसीसीआयने अक्षर पटेललाही टीम इंडियाच्या नेतृत्व गटाचा भाग बनवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा-

खेळाडूंची मजा संपली, बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, लादले 10 कडक निर्बंध
KHO KHO WC; भारताने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भुटानला नमवलं, 71-34 ने दणदणीत विजय
महाराष्ट्रावर भारी विदर्भ! प्रथमच फायनलमध्ये एंट्री, या संघाशी होणार जेतेपदाचा सामना

Related Articles