भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी20 सामन्यांमधील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (18 मार्च) खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या सामन्याचा सामनावीर सूर्यकुमार यादव ठरला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत आपल्या पहिल्या टी -20 सामन्यात 31 चेंडूत 57 धावा केल्या. मात्र सॅम करनच्या चेंडूवर सूर्यकुमार वादग्रस्त पद्धतीने बाद झाला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या विकेटवर प्रश्न उपस्थित केले असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनेही यावर निराशा व्यक्त केली.
सूर्यकुमार 14 व्या षटकात सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारताना डेव्हिड मलानच्या हातून झेलबाद झाला. तथापि, डेव्हिड मालनचा हा झेल काही वादात अडकला. कारण जेव्हा मलानने चेंडू पकडला त्यानंतर त्या चेंडूने जमीनीला स्पर्श केला की नाही याबद्दल गोंधळ झाला. तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याने आणि मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिंग्नल बाद दिलेला असल्याने सुर्यकुमारला बाद घोषित करण्यात आले. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, पार्थिव पटेल, संजय बांगर आणि आकाश चोप्रा यांनीही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले. कर्णधार कोहलीही सूर्यकुमारच्या विकेटवर नाखूष दिसत होता. त्याचवेळी अभिनेता रणवीर सिंगनेही या विकेटमुळे नाराजी दर्शवत ट्विट केले की ”माफ कर पण मला वाटते डेव्हिड मलानकडून तो कॅच पूर्णपणे सुटला होता. चेंडू जमिनीवर आदळला होता, असे माझे मत आहे. परंतु, जाऊद्या.”
Sorry but Dawid Malan totally dropped that for me…the ball was grounded ! I mean , come on ????????♂️ #INDvENG ????
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 18, 2021
एवढेच नाही तर अभिनेता फरहान अख्तरने ट्विट करून लिहिले आहे की, “सूर्यकुमार यादवने चमकदार खेळी केली, सर्वोत्कृष्ट खेळी केली. परंतु, शेवट खेदजनक झाला.”
Well played @surya_14kumar .. Great knock. Tragic end.
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) March 18, 2021
बॉलिवूड गायिका श्रेया घोषालनहीे लिहिले की, “सूर्यकुमार यादवच्या खेळीसाठी मी खुश आहे. तो उत्कृष्ट खेळला, पण पंचांनी त्याच्या विकेटबाबाद देण्यात आलेल्या निर्णयामुळे निराश आहे. माझ्या मते तो स्पष्ट नाबाद होता. सूर्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. सौम्यदीप घोषाल आणि तू दोघेही अनुशक्तीनगर कॉलनीच्या मैदानात लहानपणी एकत्र खेळले आहात. तुमच्यासाठी खूप आनंदी आहे.”
Was cheering for @surya_14kumar Very well played! Disappointed by umpire’s decision for declaring it out. To me it was clearly not out. We all are so proud of you Surya. @soumghoshal & you played together as kids in the same Anushaktinagar colony ground. Feeling so happy for you!
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) March 18, 2021
सुर्यकुमारचा पहिला षटकार
या सामन्यात सुर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर षटकारही ठोकला होता. विशेष म्हणजे हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला चेंडू होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू खरंच मूर्ख आहेस…”, आपलीच खेळी पुन्हा मोबाईलवर पाहात असलेल्या सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराची एमकमेकांना धक्काबुक्की, व्हिडिओ होतोय व्हायरल
पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यासाठी ‘असा’ असेल भारताचा संभाव्य संघ