आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 साठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ठरला आहे. विश्वविजेता पॅट कमिन्स नाही तर मिचेल मार्श अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या मेगा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करेल.
ऑस्ट्रेलिया पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात मिचेल मार्श संघाचा कर्णधार असेल याचं जोरदार समर्थन केलं. ॲरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर मार्शनं खेळाच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा सर्व फॉर्मेटमधील भरवशाचा खेळाडू बनला आहे.
ऑस्ट्रेलियानं शेवटचा टी-20 विश्वचषक ॲरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळला होता. मात्र यावेळी कर्णधार मिचेल मार्श असेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी वर्ल्ड कप 2023 विजेता कर्णधार पॅट कमिन्स संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलियाला 6 जून रोजी वर्ल्ड कप 2024 चा पहिला सामना खेळायचा आहे.
Cricket.com.au नुसार, मॅकडोनाल्ड क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 32 वर्षीय मार्शकडे कर्णधारपद सोपवण्याची शिफारस करतील. मॅकडोनाल्ड त्यांच्या पसंतीच्या कर्णधाराबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सल्ला देण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली आणि टोनी डोडेमाइड यांच्या पॅनेलवर बसणार आहे. “मला वाटतं की सर्व घटक मिशेल मार्शच्या बाजूनं आहेत. फक्त काही बाबींचं निराकरण करणं आवश्यक आहे. तो टी 20 संघासोबत ज्या प्रकारे कार्य करतोय याबद्दल आम्ही आनंदी आणि निश्चिंत आहोत. आमचा विश्वास आहे की तो विश्वचषकात संघाचं नेतृत्व करेल”, असं ते म्हणाले.
मिशेल मार्श हा अष्टपैलू कौशल्य असलेला खेळाडू आहे. मॅकडोनाल्ड आणि त्यांचे सहकारी निवडकर्तेही मार्शच्या कौशल्यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यांच्या मते तो असा खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी असो एकदिवसीय किंवा T20, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो. विकेटकीपर फलंदाज ट्रॅव्हिस हेड देखील ऑस्ट्रेलिया टी 20 संघाचा भाग असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं