महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मुंबई इंडियन्स संघाच्या रूपात पहिला विजेता मिळाला. पुरुषांच्या मुंबई इंडियन्स संघाप्रमाणेच महिलाच्या संघानेही आपली ताकद दाखवून दिली. रविवारी ( 26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर 7 विकेट्सने विजय साकारला. तसेच, डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेचे पहिले-वहिले विजेतेपद पटकावले. याबरोबर मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये आणखी एका ट्रॉफीची भर पडली.
भारतातील श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स स्पोर्ट्स या कंपनीकडे मुंबई इंडियन्सची मालकी आहे. मुंबई इंडियन्स ही केवळ आयपीएल व डब्ल्यूपीएल इतकीच मर्यादित नसून, विविध देशांमधील लीगमध्ये देखील त्यांनी संघ खरेदी केले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एसए टी20 मध्ये एमआय केपटाऊन, युएईत एमआय एमिरेट्स व अमेरिकेत एमआय न्यूयॉर्क असे संघ दिसून येतात.
𝑴𝒂𝒈𝒊𝒄𝒂𝒍. 𝑯𝒊𝒔𝒕𝒐𝒓𝒊𝒄. 𝑼𝒏𝒇𝒐𝒓𝒈𝒆𝒕𝒕𝒂𝒃𝒍𝒆.
𝑾𝒆 𝒂𝒓𝒆 𝑴𝒖𝒎𝒃𝒂𝒊 𝑰𝒏𝒅𝒊𝒂𝒏𝒔 🏆💙#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL2023 #DCvMI #WPLFinal #ForTheW pic.twitter.com/dUrpJHyrGx
— Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2023
डब्ल्यूपीएल विजेतेपदासोबतच मुंबईच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये देखील वाढ झाली. मुंबईच्या खात्यात सर्वात पहिली ट्रॉफी 2011 चॅम्पियन्स लीगच्या रूपाने आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. त्याच वर्षी त्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग जिंकण्यात यश आले. मुंबईने यानंतर आयपीएल विजेतेपदांचा धडाका लावला. 2015, 2017, 2019 व 2019 यावर्षी देखील आयपीएल ट्रॉफी मुंबईकडेच राहिली. सर्वाधिक पाच वेळा आयपीएल जिंकणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ त्यानंतर आता डब्ल्यूपीएल विजेतेपदासोबतच त्यांच्या एकूण विजेतेपदांची संख्या 8 पर्यंत पोहोचली आहे.
डब्ल्यूपीएल अंतिम सामन्याचा विचार केल्यास मुंबईने सुरुवातीलाच घातक गोलंदाजी करत दिल्लीची अवस्था खराब केली होती. 79 धावांवर दिल्लीने आपल्या 9 विकेट्स गमावलेल्या. मात्र, शिखा पांडे व राधा यादव यांनी नाबाद भागीदारी करत दिल्लीला 131 पर्यंत मजल मारून दिले. त्यानंतर मुंबईला देखील या धावांसाठी संघर्ष करावा लागला. नॅट सिव्हर-ब्रंटने अखेरपर्यंत नाबाद राहत अर्धशतक करून संघाला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
(Now Mumbai Indians Won 8 League Trophies In IPL WPL And Champion League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 44 चेंडूत टी20 क्रिकेटमध्ये शतक! क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकी संघ फायद्यात
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी