भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या चालू असलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन्ही वनडे सामने भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे सध्या भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यातच न्यूझीलंड पोलिसांनीही गमतीशीर पद्धतीने भारतीय संघाने मिळवलेल्या विजयांचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाने माऊंट मॉनगनुई येथे शनिवारी(26 जानेवारी) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर इस्टर्न डिस्ट्रीक्ट पोलिस(न्यूझीलंड) यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर न्यूझीलंडच्या नागरिकांना भारतीय संघापासून सावध रहा अशी चेतावणी दिली आहे.
त्यांनी मजेदार फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘पोलिस देशाच्या नागरिकांना चेतावणी देऊ इच्छित आहे की आपल्या देशाचा दौरा करण्यासाठी आलेली एक टोळी सध्या धूमाकुळ घालत आहे. रिपोर्ट असा आला आहे की या टोळीने निष्पाप दिसणाऱ्या न्यूझीलंड वासियांवर(न्यूझीलंड संघ) नेपीयर आणि माऊंट मॉनगनुई येथे वाईटपद्धतीने हल्ला केला आहे. त्यामुळे तूमच्याजवळ क्रिकेट बॅट किंवा बॉल असे काही असेल तर तूम्ही अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे.’
या पोस्टबरोबरच इस्टर्न डिस्ट्रीक्ट पोलिस(न्यूझीलंड) यांनी भारतीय संघाचा एक फोटोही शेअर केला आहे.
https://www.facebook.com/EasternDistrictPoliceNZ/posts/1967650623290443
भारताने न्यूझीलंड विरुद्ध नेपीयर येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तर माऊंट मॉनगनुई येथे दुसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला होता. आता पुढील सामना सोमवारी (28 जानेवारी) माऊंट मॉनगनुई येथेच पार पडणार आहे.
हा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर भारत या वनडे मालिकेतही विजयी आघाडी मिळवेल. तसेच 2009 नंतर न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचाही पराक्रम करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–नेपाळच्या या १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूने मोडला सचिन तेंडुलकरचा २९ वर्षीय जूना विक्रम
–कुलदिप यादव, युजवेंद्र चहलची चमकदार कामगिरी सुरूच…
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड