Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बार्थोलोमेव ऑग्बेचेची हॅट्ट्रिक; हैदराबादचा यजमान गोवावर दणदणीत विजय, पुन्हा नंबर वन!

बार्थोलोमेव ऑग्बेचेची हॅट्ट्रिक; हैदराबादचा यजमान गोवावर दणदणीत विजय, पुन्हा नंबर वन!

January 6, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
Hyderabad FC

Photo Courtesy: Twitter/Hyderabad FC


हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या मॅचविक 14ची सुरुवात दणक्यात झाली. बार्थोलोमेव ऑग्बेचेने हॅटट्रिक नोंदवताना हैदराबाद एफसीला दणदणीत विजय मिळवून दिली. एफसी गोवाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून हैदराबादने 31 गुणांसह पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली. गोवाकडून रिदीम थिलांगने एकमेव गोल केला.

घरच्या मैदानावर गोवाने पहिल्या 15 मिनिटांच्या खेळात वर्चस्वपूर्ण खेळ केला. नोआ सदौईने प्रभाव पाडत हैदराबादच्या बचावपटूंना तणावात ठेवले. पण, दोन्ही संघांकडून एकही ऑन टार्गेट प्रयत्न झालेला दिसला नाही. 19व्या मिनिटाला एबानभा डोहलिंगच्या क्रॉसवर सदौईला हेडरद्वारे गोल करण्याची संधी मिळाली होती, परंतु चेंडू पोस्टवरून गेला. पण, हैदराबादने 20व्या मिनिटाला पहिला पलटवार केला अन् गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. हरिचरण नार्झरीने बॉक्सबाहेरून क्रॉस दिला अन् बार्थोलोमेव ऑग्बेचेने अप्रतिम हेडरद्वारे गोल केला. 20 मिनिटं चांगला बचाव करणाऱ्या गोवाला एक चूक महागात पडली.

40व्या मिनिटाला गोवाच्या बचावपटूंनी पुन्हा एकदा ऑग्बेचेला तशीच संधी दिली, परंतु यावेळी नशीब जोरावर असल्याने हैदराबादला गोल करता आला नाही. 43व्या मिनिटाला ऑग्बेचे व जोएल चिनीझी यांच्यात ताळमेळ चुकले अन् हैदराबादने दुसऱ्या गोलची संधी गमावली. हेडर कोणी मारावा यावरून दोघेही संभ्रमात दिसले. पहिल्या हाफमध्ये गोवाने चेंडूवर अधिक काळ राखून वर्चस्व गाजवलेले दिसले तरी एका गोलने हैदराबादला फ्रंटसीटवर बसवले. दुसऱ्या हाफमध्ये यजमानांनी आत्मविश्वासाने खेळ केला. 54व्या मिनिटाला गोवाला बरोबरीचा गोल करता आला. नोआ सदौईच्या क्रॉसवर रिदीम थिलांगने सुरेख गोल केला. दोन बचावपटू रोखण्यासाठी तयार असतानाही रिदीमने त्यांच्या मधून गोल केला.

🔥 VICTORY at Fatorda!

The King goes reigning in Goa and Hyderabad beat the Gaurs to start our 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ on the front foot… 💪#FCGHFC #WeAreHFC #మనహైదరాబాద్ #HyderabadFC pic.twitter.com/1ahuHSWxTn

— Hyderabad FC (@HydFCOfficial) January 5, 2023

गोवाच्या आक्रमणाची धार तीव्र होताना दिसली अन् त्यांच्याकडून सातत्याने गोल प्रयत्न होत राहिले. 74व्या मिनिटाला सदौई चेंडू घेऊन पुन्हा गोलजाळीच्या तोंडावर पोहोचला होता, परंतु अंतिम दिशा देण्यापासून तो चुकला. हैदराबादने 79व्या मिनिटाला पुन्हा आघाडी घेतली. गोवाच्या बचावपटूंच्या पेनल्टी क्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा उचलताना ऑग्बेचेने हा गोल केला. हैदराबादकडून आता चेंडूवर ताबा राखून वेळ घालवण्याचा खेळ सुरू झाला. त्यांना गोवाला आता कोणतीच संधी द्यायची नव्हती. ऑग्बेचेने 90व्या मिनिटाला हॅटट्रिक पूर्ण केली आणि हैदराबादची आघाडी 3-1 अशी मजबूत केली. अब्दुल अंजुकंदनने हा पास दिला होता. अशाप्रकारे हैदराबादने हा सामना सहज जिंकला.

निकाल: हैदराबाद एफसी 3 ( बार्थोलोमेव ऑग्बेचे 20 मि., 79 मि. आणि 90 मि. ) विजयी. वि. एफसी गोवा 1 ( रिदीम थिलांग 54 मि.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापू भारी छे! पुणेकरांच्या साक्षीने षटकारांची आतिषबाजी करत अक्षरने रचला मोठा विक्रम
थरारक सामन्यात भारत पराभूत, श्रीलंकेची विजयासह मालिकेत बरोबरी, अक्षरने जिंकली पुणेकरांची मने!


Next Post
Kapil Dev

...आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल

sairaj bahutule

वाढदिवस विशेष: क्रिकेटर साईराज बहुतुले

Bengaluru FC

बंगळुरू एफसीला सतावतेय फॉरवर्ड लाईनची समस्या, नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143