लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा १ डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला होता. दरम्यान, तिसऱ्या दिवशी टीचून फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बाद होऊन माघारी परतला होता.
चेतेश्वर पुजारा हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. अनेकदा त्याला संघाबाहेर करण्याची देखील मागणी केली गेली आहे. परंतु विराट कोहली त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला संधी देत आहेत. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना रोहित शर्मा आणि विराटसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती. तसेच तिसऱ्या दिवसाखेर तो ९१ धावांवर नाबाद परतला होता.
पुजारा चौथ्या दिवशी शतक झळकावून मोठी खेळी खेळणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, त्याला असे करता आले नाही. तो दिवसाअखेरच्या धावसंख्येत एकही धाव जोडू शकला नाही.
तर झाले असे की,८४ वे षटक टाकण्यासाठी ऑली रॉबिन्सन गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसराच चेंडू रॉबिन्सनने पॅडच्या दिशेने टाकला. पुजाराने तो चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो चेंडू आत आला आणि पुजाराच्या पॅडला लागला. त्यावेळी इंग्लिश खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली. परंतु, पंचांनी मान हलवून नकार दिला. त्यावेळी जो रुटने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये स्पष्ट दिसून येत होते की, चेंडू यष्टीला जाऊन लागतोय. त्यामुळे पंचांनी आपला निर्णय बदलत पुजाराला बाद घोषित केले.(Ollie Robinson sent back Cheteshwar pujara to the pavelian, watch video)
YESSSS Robbo!!
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/gs7dV73IE3
— England Cricket (@englandcricket) August 28, 2021
भारतीय संघाचा १ डाव ७६ धावांनी पराभव
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मजबूत पकड बनवल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करतील अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा ९१ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली देखील ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे अवघ्या १० तर रिषभ पंत १ धाव करत स्वस्तात माघारी परतले.
शेवटी जडेजाने ३० धावांची झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! पराभवानंतर भारताचा प्रमुख खेळाडू झाला दवाखान्यात दाखल
“आम्ही भारतासहित कोणत्याही संघाला हरवू शकतो”, पाकिस्तानी खेळाडूने केला दावा
भाविना पटेलने गाठली टोकियो पॅरालंपिक स्पर्धेची अंतिम फेरी, सुवर्णपदक पटकावण्यापासून एक पाऊल दूर