भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आजपासून (४ ऑगस्ट) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट चाहते ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही मालिका सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज मयंक अगरवालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच हा सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य फलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
ही मालिका सुरू होण्याच्या २ दिवसापूर्वी नेट्समध्ये सराव करत असताना मोहम्मद सिराजचा चेंडू मयंक अगरवालच्या डोक्याला लागला होता. ज्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच इंग्लंड संघाचा मुख्य फलंदाज ऑली पोप देखील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होणार असल्याचे समजत आहे. ऑली पोपला मांडीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला बाहेर बसावे लागणार आहे. ऑली पोप बाहेर झाल्यानंतर जॉनी बेअरस्टोचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगळवारी झालेली फिटनेस चाचणी ऑली पोप पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी इंग्लंड संघात जॉनी बेअरस्टो आणि डेन लॉरेन्स हे २ पर्याय उपलब्ध होते. या दोघांपैकी एका फलंदाजाला ५ व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यातही जॉनी बेअरस्टो यासाठी प्रबळ दावेदार आहे. (Ollie pope ruled out of the First test against India,due to injury)
Jonny Bairstow set to resume Test career after Ollie Pope ruled out through injury / @NHoultCricket reports #ENGvIND
https://t.co/n950APtMpe pic.twitter.com/fNvGJmK1v6— Telegraph Cricket (@TeleCricket) August 3, 2021
जॉनी बेअरस्टोने शेवटची कसोटी मालिका मार्च महिन्यात भारतीय संघाविरुद्ध खेळली होती. मालिकेतील ४ डावात तो ३ वेळेस भोपळाही न फोडता माघारी परतला होता. त्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेतील चांगली कामगिरी त्याला इंग्लंड संघात स्थान निश्चित करण्यासाठी मदत करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मात असलेल्या रहाणेची जागा धोक्यात! चौफेर फटकेबाजी करणारा ‘हा’ खेळाडू करू शकतो रिप्लेस
ENGvIND: इंग्लंडविरुद्ध दम दाखवत ‘हे’ ४ भारतीय खेळाडू संघाला करुन देणार विजयी सुरू
जडेजा किंवा अश्विनला बाकावर बसवत कोहली ‘या’ शिलेदारावर लावणार डाव, बघा कोण आहे तो?