fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

१२ धावांवर बोल्ड झालेल्या लाराने पुढे केल्या होत्या नाबाद ५०१ धावा

आजच्या दिवशी पंचवीस वर्षांपुर्वी ब्रायन लाराने आपल्या कारकिर्दीतील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील संस्मरणीय खेळी केली होती. जगाला विश्वास बसणार नाही अशी ५०१* धावांची नाबाद खेळी केली.

लाराने काऊंटी चॅम्पियन्सशिपमध्ये वॉरविकशायरकडून खेळताना डरहॅमविरूध्द बर्मिंगहममध्ये ही खेळी केली होती. यात त्याने ७२ वेळा चेंडू सीमापार लावला. ४२७ चेंडूंच्या खेळीमध्ये ६२ चौकार आणि १० षटकार लगावले.

लाराने खास आपल्या शैलीत ज़ॉन मॉरिसला कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह करत ५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. हनीफ मोहम्मद यांचा ४९९ धावांचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील विक्रम लाराने या खेळीद्वारे मोडीत काढला.

लाराला या खेळीदरम्यान दोनदा जीवनदान मिळाले. १२ धावांवर असताना त्रिफाळचीत झाला परंतु चेंडू नो-बॉल निघाला, १८ धावांवर खेळत असताना यष्टीरक्षक ख्रिस स्कॉटने झेल सोडला.

लाराने २००४ मध्ये ऍंटिग्वा कसोटीत इंग्लंडविरूद्ध नाबाद ४०० धावांची विक्रमी खेळी केली होती. ही खेळीही कसोटीमधील एका डावातील सर्वोच्च खेळी आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

नाबाद ५०१- ब्रायन लारा, वॉरविकशायर वि. डरहॅम, १९९४

४९९- हनिफ मोहम्मद, कराची वि. बहावलपूर, १९५९

नाबाद ४५२- सर डाॅन ब्रॅडमन, न्यू साऊथ वेल्स वि क्विन्सलॅंड, १९३०

नाबाद ४४३- बी. बी. निंबाळकर, महाराष्ट्र वि काठिवार, १९४८

४३७- बील पाॅन्सफोल्ड, विक्टोरिया वि क्विन्सलॅंड, १९२७

You might also like