ती तारीख ना धोनी विसरला, ना चेन्नई सुपर किंग्जचे चाहते…

मागील २ महिन्यांपासून क्रीडाजगत कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले आहे. चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही या लॉकडाऊनचा त्रास होत आहे. परंतु आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघ क्रिकेटपासून २ महिने नाही तर २ वर्षे दूर राहिला होता. त्यानंतर पुनरागमन करत तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते.

तो दिवस होता २७ मे २०१८. त्या दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईने सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघावर ८ विकेट्सने विजय मिळवत चाहत्यांना भेट दिली होते. तसेच संपूर्ण जगाला सांगितले होते की त्यांनी पुनरागमन केले आहे.

अंतिम सामन्यापूर्वी समालोचकांची भविष्यवाणी हैद्राबाद संघाच्या बाजूने होती. कारण चेन्नईने (Chennai Super Kings) हैद्राबादला अगोदरच आयपीएलमध्ये ३ वेळा पराभूत केले होते. परंतु धोनीच्या संघाने त्यांना चूकीचे सिद्ध केले होते.

वानखेडे स्टेडियममध्ये ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) धोनीने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई संघाच्या गोलंदाजीवर हैद्राबाद संघाने ६ बाद १७८ धावा केल्या.

हैद्राबाद संघाने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अनुभवी खेळाडू शेन वॉटसनने (Shane Watson) सांभाळला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातून चेन्नईमध्ये आलेल्या वॉटसनने कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाकडून मिळालेला पाठिंबा सार्थ ठरविला.

सलामीला फलंदाजी करणाऱ्या वॉटसनने २०० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ५७ चेंडूत नाबाद ११७ धावांची विजयी खेळी केली होती. त्यात ८ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या खेळीमुळे चेन्नईने १८.३ षटकात केवळ २ विकेट्स गमावून १८१ धावा केल्या. अशाप्रकारे त्यांनी सामना ८ विकेट्सने जिंकला होता.

२०१८ च्या आयपीएलमध्ये २ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या चेन्नईचा प्रवास स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका चित्रपटांच्या कहाणीपेक्षा कमी नव्हता. मग ते आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) १ विकेटने मिळालेला रोमांचक विजय असो किंवा मग विवादामुळे आपले घरचे मैदान सोडून जाणे, चेन्नईने संपूर्ण स्पर्धेत चाहत्यांचे मनोरंजन केले. तसेच शेवटी ट्रॉफी जिंकून २ वर्षांच्या बंदीची भरपाई केली.

सामन्यानंतर कर्णधार धोनीने म्हटले होते की, “आज २७ तारीख आहे, माझ्या जर्सीचा क्रमांक ७ आहे आणि हा आमचा सातवा अंतिम सामना आहे. त्यामुळे विजयाचे अनेक कारण होते.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा

-बापरे! ४० टी२० सामने खेळून एकही चौकार न मारता आलेले २ भारतीय

-२००पेक्षा जास्त वनडे खेळून कधीही एकही चेंडू न टाकलेले ५ क्रिकेटपटू

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.