भारताकडून आजपर्यंत अनेक महान क्रिकेटपटू खेळले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे विक्रमही प्रस्तापिक केले. पण यात सुनील गावसकरांचे नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिल. गावसकरांनी त्यांच्या कारकिर्दीतील १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. त्यांनी या काळात अनेक मोठे विक्रम रचले. त्यांच्या खेळामुळे ते सचिन तेंडुलकरसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंसाठी आदर्श बनले. अशा गावसकरांसाठी ६ मार्च हा खुपच खास दिवस आहे.
कारण बरोबर ५१ वर्षांपुर्वी, ६ मार्च १९७१ या दिवशी ‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर यांनी कसोटी सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रारंभ केला होता. हा सामना वेस्ट इंडिज संघाबरोबर पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला होता. या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात ६५ धावा तर दुसऱ्या डावात नाबाद ६७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडिजचे फ्रेडेरीस्क बाद झाले होते. यामुळे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर एक विकेट पाहाण्याचे भाग्य देखील त्यांना लाभलं होतं.
त्यानंतर १२ वर्षांनी त्यांनी कसोट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. हा विक्रम त्यांच्या नावावर पुढे ९ वर्ष, ३ महिने आणि ३ दिवस राहीला. तसेच ते कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू आहेतच, पण ३४ शतके करणारेही पहिले क्रिकेटपटू होते.
सुनील गावसकर यांनी कसोटीतील पहिल्या ८ डावात ६५, ६७*, ११६, १, ११७*, १२४, २२० धावा केल्या होत्या. पहिल्या ८ डावानंतर त्यांनी ७७४ धावा केल्या होत्या. हा विक्रम पुढे विनोद कांबळीने ७९३ धावा करत मोडला.
गावसकर त्यांच्या कारकिर्दीत १२५ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ३४ शतकांसह ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी १०८ वनडे सामने खेळताना ३५.१३ च्या सरासरीने १ शतकासह ३०९२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिली कसोटी: भारताने श्रीलंकेचा उडवला धुव्वा, फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना
वॉर्नच्या आकस्मित निधनानंतर मुलांना बसलाय मानसिक धक्का; सातत्याने…
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल