Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video: सहा वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी20 मध्ये झळकावले होते वेगवान शतक

सहा वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी20 मध्ये झळकावले होते वेगवान शतक

December 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma

Photo Courtesy: Twitter/@BCCI


भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला 2017 मध्ये पहिल्यांदाच टी20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये तुफान कामगिरी केली होती. यासह अनेक मोठे विक्रम देखील केले होते.

रोहित शर्मासाठी 22 डिसेंबर हा दिवस अतिशय खास आहे. याच दिवशी 2017 मध्ये रोहित शर्माने आपल्या टी20 कारकिर्दीतील विश्वविक्रमी शतक झळकावले होते. हा कर्णधार म्हणून त्याचा दुसराच सामना होता. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत, अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. हे शतक झळकावण्याच्या 9 दिवसांपूर्वी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील तिसरे दुहेरी शतक झळकावले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. (on this day rohit sharma  scored joint fastest century  in T20I)

इंदोरच्या मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळला गेला होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली होती. यादरम्यान रोहित शर्माने 118 तर केएल राहुलने 89 धावांची खेळी केली होती. तसेच 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत तो संयुक्तरीत्या जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला होता. यापूर्वी डेविड मिलरने देखील 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. (India vs Sri Lanka 2017)

या सामन्यात भारतीय संघाने 20 षटक अखेर 5 गडी बाद 260 धावा केल्या होत्या. जी त्यावेळी कुठल्याही संघाने टी20 सामन्याच्या एका डावात केलेली दुसरी सर्वाधिक धावसंख्या होती. ही भारतीय संघाची टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरली होती.

🗓️ #OnThisDay in 2017!@ImRo45 creamed 1⃣2⃣ fours & 1⃣0⃣ sixes and scored the joint-fastest T20I💯. 👏 🙌 #TeamIndia

Watch that stunning 43-ball 118-run knock 🎥 🔽

— BCCI (@BCCI) December 22, 2021

भारतीय संघाचा 88 धावांनी विजय
श्रीलंका संघाकडून उपुल थरांगा आणि कुसल परेराने झुंज दिली. उपुल थरांगाने 47 तर कुसल परेराने 77 धावांची खेळी केली होती. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर श्रीलंका संघाचा डाव अवघ्या 17.2 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाने हा सामना 88 धावांनी आपल्या नावावर केला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
तब्बल 12 वर्षानंतर जयदेव उनाडकट भारताच्या कसोटी संघात, त्याच्याआधी दिनेश कार्तिकने…


Next Post
Team India Jaydev Unadkat vs BAN

बांगलादेशविरुद्ध जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात, यजमानांचे दोन्ही सलामीवीर परतले तंबूत

Lionel Messi

'विश्वविजेता' मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल

IPL Auction

IPL 2023 Auction: पाकिटातील रक्कम, लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे जाणून घ्या एकाच क्लिकवर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143