…आणि भारताला नेहमीच नडलेल्या कूकने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी दवडली!!

कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा ऍलिस्टर कूक खेळत होता तेव्हा सतत एक गोष्ट सांगितली जात होती आणि ती म्हणजे कूक सचिनचा कसोटी धावांचा विक्रम नक्की मोडेल. यापुर्वीही सचिनचा विक्रम मोडण्याची क्षमता संगकारा किंवा कॅलिससारख्या खेळाडूंकडून केली जात होती. परंतु कूक हा विक्रम मोडेल यासाठी कूकच्या बाजून असंख्य गोष्टी होत्या.

त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्याचे वय. कूकने बरोबर एक वर्षापूर्वी (११ सप्टेंबर) निवृत्ती घेतली तेव्हा त्याचे वय होते ३३ वर्ष आणि त्याने १६१ कसोटी सामन्यात धावा केल्या होत्या १२४७२. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी कूकला धावांची गरज होती ३४४९. म्हणजेच धावा आणि वय या बाबतीत कूक बराच पुढे होता. सचिनच्या कसोटी धावांच्या शर्यतीतील बाकी अनेक खेळाडू या बाबातीत विक्रम मोडतील किंवा नाही याबद्दल थोडी शंका होतीच परंतु कूकबद्दल तसं काही नव्हतं.

अनेक गोष्टी ह्या कूकच्या बाजूने होत्या. फक्त एक गोष्ट कूकच्या विरोधात जाणारी होती आणि ती गोष्ट अर्थात क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी इर्षा. येथेच कूक हरला होता. तो शेवटच्या काही वर्षात मनाने पुर्णपणे थकलेला दिसत होता. शेवटच्या ९-१० कसोटी सामन्यात कूकला समाधानकारक कामगिरीही करता आली नव्हती. असे असताना हाच कूक कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात भारताला नडलाच.

भारतीय संघ तसा त्याचा आवडता संघ. नागपुरला पदार्पण करताना २२ वर्षीय कूकने पहिल्या डावात ६० तर दुसऱ्या डावात नाबाद १०४ धावांची खेळी केली होती. इरफान पठाण, श्रीशांत, अनिल कुंबळे, हरभजन सिंग सारख्या कसलेल्या गोलंदाजांना त्याने चांगले तोंड देत या दोन खेळी केल्या होत्या. याच मालिकेतील तिसऱ्या कसोटीत तो संघात नव्हता. परंतु त्यानंतर सलग १५९ कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याने केला.

अशीच काहीशी परिस्थिती त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यातही होती. ओव्हल कसोटीत जेव्हा त्याने क्रिकेटला गुडबाय केले त्यापुर्वी सलग ९ कसोटी सामन्यात कूक मोठ्या प्रमाणावर फ्लाॅप ठरला होता. इंग्लंड तसेच जगात त्याच्या निवृत्तीला घेऊन चर्चा होऊ लागल्या होत्या. असे असताना कूकने निवृत्तची घोषणा केली तसेच शेवटच्या सामन्यात भारताला थोड्याफार विजयाच्या अपेक्षा सुरुवातीपासूनच होत्या त्यात कूकने ७१ आणि १४१ धावांची शानदार खेळी करुन इंग्लंडला विजय मिळवुन दिला.

ही कसोटी जिंकत इंग्लंडने मालिका ४-१ने जिंकली तसेच आजच्याच दिवशी ११ सप्टेबर २०१८ रोजी इंग्लंडच्या या महान कसोटीपटूला विजयी अलविदा केला. १६१ कसोटी सामने इंग्ल्ंडच्या खेळाडूला खेळायला मिळणं ही तशी नक्कीच छोटी गोष्ट नाही. त्याला तुमच्यात प्रतिभाच लागते आणि हीच प्रतिभा कूकमध्ये ठासुन भरली होती. भारतीय क्रिकेटप्रेमी जगभरातील ज्या मोजक्या क्रिकेटप्रेमींवर भारतीय क्रिकेटप्रेमींसारखं प्रेम केलं त्यातलं एक अग्रणी नाव अर्थात कूक. आज क्रिकेटला अलविदा करुन १ वर्ष झाल्यानंतर हा खेळाडू देशांर्तगत क्रिकेट खेळत आहे आणि जगभरातील चाहत्यांना चांगल्या खेळीची पर्वणी देत आहे. जुलै महिन्यात या खेळाडूंचे विंब्लडनला दर्शन झाले होते. तेव्हा सुटाबुटात आलेला हा खेळाडू एक राजपुत्रापेक्षा कमी वाटतं नव्हता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

वाढदिवस विशेष: स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

आता पुन्हा ऐका क्रिकेटचे समालोचन ऑल इंडिया रेडिओवर…

तब्बल १० भारतीय खेळाडू सहभागी होत असलेल्या चेस विश्वचषकाबद्दल सर्वकाही…

You might also like