पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज सकलेन मुश्ताक याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. यामागचे कारण असे की, आजच्याच दिवशी त्याने (११ जून) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. १९९९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सकलेन मुश्ताक याने घेतलेल्या हॅट्रिकमुळे पाकिस्तान संघाने १४८ धावांनी विजय मिळवला होता.
सकलेन मुश्ताकने शेवटच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार मिळू शकला असता, परंतु हा पुरस्कार सईद अनवरला देण्यात आला होता. अनवरने या सामन्यात १०३ धावांची शतकी खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला ५० षटक अखेर ९ बाद २७१ धावा करण्यात यश आले होते.
तर झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी करताना हिथ स्ट्रिक आणि हेनरी ओलोंगा यांनी २-२ गडी बाद केले होते. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाला ४०.३ षटकात अवघ्या १२३ धावा करण्यात यश आले होते. या डावात सकलेन मुश्ताक याने ४१ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ओलोंगा, दुसऱ्या चेंडूवर ऍडम हकल आणि तिसऱ्या चेंडूवर पोमी म्बांग्वा याला माघारी धाडत हॅट्रिक घेतली होती.
अनेकांना माहीत नसेल, सकलेन मुश्ताक याचे वडील सरकारी लिपीक म्हणून कार्यरत होते. याच सकलेन मुश्ताकचे नाव एकेकाळी सचिन तेंडुलकरसोबत देखील जोडले गेले होते. या गोलंदाजाने १९९९ मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला माघारी धाडले होते.
☝️ Henry Olonga
☝️ Adam Huckle
☝️ Pommie Mbangwa#OnThisDay in 1999, Saqlain Mushtaq became the second bowler to pick up a @cricketworldcup hat-trick 🤩 pic.twitter.com/COfQoHJng5— ICC (@ICC) June 11, 2020
सकलेन मुश्ताकने एका मुलाखतीत म्हटले होते की, “सचिन सोबत नाव जोडले जाणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. देव त्यादिवशी माझ्या बाजूने होता. मी असा विचार केलाच नव्हता की, मी सचिनला बाद करेल. परंतु जर देवाची ईच्छा असेल तर ती आपण बदलू शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मला या गोष्टीचा अभिमान असेल की, मी सचिनला बाद केले होते. माझे नाव त्याच्यासोबत जोडले जाईल.”
सकलेनने आपल्या कारकीर्दीत एकूण ४९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २०८ गडी बाद केले होते. तसेच १६९ वनडे सामने खेळताना २८८ गडी बाद करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट नव्हे ‘हे’ फलंदाज कव्हर ड्राइव्हचे मास्टर, कर्णधार आझमने सांगितली नावे
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये सिराजची जागा पक्की, ३०३ विकेट्स घेणारा गोलंदाज बसणार बाकावर?
मॅच फिक्सिंगमुळे १० वर्षांसाठी निलंबित झालेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनणार मॅच रेफरी!