रविवारी (११ जुलै) इटली आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये युरो चषक २०२० चा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात इटली संघाने इंग्लंड संघावर पेनल्टी शूट आऊटमध्ये ३-२ ने विजय मिळवत युरो चषक २०२० चे जेतेपद पटकावले. इटली संघ मायदेशी परतल्यानंतर सर्वच खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्रभर या विजयाचा जल्लोष सुरूच होता. हा जल्लोष सुरू असतानाच विजयाला गालबोट लावणारी घटना घडली आहे.
इटलीचा कर्णधार चियेलीनीने रोमच्या लिओनार्दो दा विंची विमानतळाच्या बाहेर पाऊल ठेवताच विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी हात हवेत केले होते. त्यानंतर प्रशिक्षक रॉबर्टो मंचीनीने युरो चषक आपल्या डोक्यावर ठेवला होता. त्याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.
इटलीच्या कोरीएरे डेला सेरा वृत्तपत्रानुसार, विजयाचा जल्लोष साजरा करत असताना अनेक चाहत्यांना गंभीर दुखापत झाली आहे. काही लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. एका चाहत्याने जल्लोष साजरा करण्यासाठी फटाके आणले होते. परंतु एक फटका त्याच्या हातात फुटल्यामुळे त्याच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे. या हल्ल्यात ६ वर्षीय मुलीला देखील गंभीर दुखापत झाली आहे. यामधे १५ लोकांना गंभीर दुखापत झाली आहे तर एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. (One dead and several injured during Italy European football championship win celebration)
इटलीने २००६ विश्वचषक स्पर्धेनंतर मोठ्या स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे राष्ट्रपती सर्जियो मातारेल्ला आणि प्रधानमंत्री मारियो द्राघी संघाचे अधिकृतरित्या स्वागत करणार आहेत.
इंग्लंडच्या हाती निराशा
इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने गेल्या एक महिन्यात चाहत्यांना अनेकदा जल्लोष साजरा करण्याचे क्षण दिले आहेत. परंतु महत्वाच्या सामन्यात इंग्लंड संघाच्या हाती निराशाच आली आहे. इंग्लंड संघाला १९६६ विश्वचषक स्पर्धेनंतर एकही मोठी स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
सानिया मिर्झाच्या आधी हैदराबादमधील मुलीबरोबर शोएब मलिकने केला होता निकाह?
भारतीय महिलांच्या आनंदावर विरजण, सामना विजयानंतर आयसीसीने ठोठावला दंड; वाचा कारण